जगाच्या नजरेत केळीचं दुकान; पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं हादरवणारं सत्य, मुंबईतील धक्कादायक घटना
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या केळेवाल्यावर कोणालाही कसलाही संशय येण्यासारखं नव्हतं, तो अगदी सामान्य आयुष्य जगत असल्याचं दाखवत होता. पण त्याचा खरा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा मात्र सर्वांना हादरवून सोडलं.
मुंबई : मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रस्त्याच्याकडेला अनेक थेलेवाले किंवा दुकानदार आपल्याला दिसतात. हे दृश्य सगळ्यांसाठी अगदी सामान्य आहे. पण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साध्या केळ्याच्या ठेल्याबद्दल असं सत्य समोर आलं आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. या केळेवाल्यावर कोणालाही कसलाही संशय येण्यासारखं नव्हतं, तो अगदी सामान्य आयुष्य जगत असल्याचं दाखवत होता. पण त्याचा खरा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा मात्र सर्वांना हादरवून सोडलं.
मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट-9 ला गुप्त माहिती मिळाली की बांद्रा रेल्वे स्टेशनजवळील एका केळ्याच्या ठेल्यावरून केवळ फळं विकली जात नव्हती, तर काहीतरी मोठं बेकायदेशीर काम सुरू होतं.
पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये पाळत ठेवली आणि योग्य वेळ साधत 60 वर्षीय मोहम्मद अली अब्दुल गफ्फार शेख याला महाराष्ट्रनगर रोडवर पकडलं.
सुरुवातीला साधं दिसणारं ठेलं पोलिसांनी चेक केलं, तेव्हा स्टीलच्या डब्यात लपवलेले 153 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 35.50 लाख रुपये आहे.
advertisement
चौकशीत मोहम्मद अलीने कबूल केलं की, स्थिर नोकरी न मिळाल्याने त्याने केळी विक्री सुरू केली होती. पण त्यातून पुरेसा नफा मिळत नव्हता. आर्थिक संकट आणि गरजेपोटी त्याने ड्रग्ज तस्करीचा मार्ग स्वीकारला.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिस हे शोधत आहेत की, त्याचे अजून साथीदार होते का? आणि हे रॅकेट किती काळापासून सुरू होतं?
advertisement
अलीकडेच वडाळा येथे 51 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या सततच्या कारवाया दाखवतात की मुंबई पोलिस ड्रग्जच्या जाळ्यावर कायमच घाव घालत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
जगाच्या नजरेत केळीचं दुकान; पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं हादरवणारं सत्य, मुंबईतील धक्कादायक घटना


