पत्रास कारण की...! दारूड्या चोरट्याचं भावनिक पत्र, सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated:

Nandurbar thief letter : नंदुरबार जिल्ह्यात दारूड्या चोरट्याने लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर वायरल झाले असून हा प्रकार चांगला चर्चेचा विषय ठरत आहे.

News18
News18
नवी दिल्ली : आत्तापर्यंत चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. ज्यापैकी काही फार गंभीर असतात तर काही फार मनोरंजक असतात. चोरीची अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे. ज्यात चक्क एका चोरट्याने पत्र लिहिलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दारूड्या चोराचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तळोदा शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुली नजिक असणाऱ्या हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बियर बारमधील ही घटना आहे. या बारमध्ये शुक्रवारी चोरी झाली. अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला.  आता चोर म्हटलं की त्याने पैसे वगैरे चोरणं असं आलं. पण हा चोर तिथंच बसून दारू प्यालला. दारूच्या दुकानात घुसून मद्याचा मनसोक्त आनंद लुटला. दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या.
advertisement
आता दारू प्यायला म्हणजे दारूची नशा चढतेच. या नशेत लोक काय काय नाही करत या चोरट्याने जाता जाता त्याने एक भावनिक पत्र लिहिलं आहे. दुकान मालक आणि पोलिसांसाठी तत्त्वज्ञानाने भरलेलं भावनिक पत्र. दारूड्या चोरट्याने लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर वायरल झाले असून हा प्रकार चांगला चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
चोरट्याने पत्रात काय लिहिलं आहे?
भाऊ आपली काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण माझी परिस्थिती अशी असल्यामुळे बेबस आहे. 'परिस्थितीमुळे मी चोर बनलो. माणूस पैशांवर प्रेम करतो.
चोर चोरच असतो? का बनवला जातो? खराखुरा चोर कोण? जो चोरतो, की जो चोर बनवतो?पोलीस खरंच इमानदार असतात का? असे प्रश्नही त्याने या पत्रात विचारले आहेत. एवढंच नव्हे तर 1999-2001 दरम्यान शहादा येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा पत्ताही विचारला.
advertisement
चोरी केल्यानंतर चोराचा माफीनामा
याआधी तमिळनाडूतील मदुराईमध्ये चोरीची अशीच एक अनोखी घटना समोर आली होती. मदुराईजवळील गावात एका चोरट्याने अगोदर चोरी केली; पण नंतर माफीनामा लिहून चोरीतील वस्तू परत केल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ चित्रपट दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या उसिलामपट्टी येथील घरात 8 फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. या घटनेत चोरट्यांनी एक लाख रुपये, पाच सोन्याची नाणी आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारांची पदके चोरून नेली होती. या प्रकरणी उसिलामपट्टी टाउन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
चोरीच्या काही दिवसानंतर चोरट्यांनी चोरीचा काही मुद्देमाल परत घटनास्थळी आणून ठेवला आहे. चोरट्यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) रात्री मणिकंदन यांच्या घरासमोर एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली. त्यामध्ये दोन पदकं आणि तमिळमध्ये एक माफीनामा आढळला. चोराने आपल्या माफीनाम्यात लिहिलं की, 'सर, आम्हाला माफ करा. तुमच्या कष्टाचं फळ परत तुमच्या हवाली करतो.' माफीनाम्याच्या चिठ्ठीसोबत चोरट्यांनी चित्रपट क्षेत्रातील दोन राष्ट्रीय पुरस्कारांची पदकं परत केली आहेत.
advertisement
मणिकंदन यांचं घर निर्जन भागात असल्याने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलं नाही. चोरट्यांनी पदकं परत केली पण पैसे आणि दागिने परत केले नाहीत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पत्रास कारण की...! दारूड्या चोरट्याचं भावनिक पत्र, सोशल मीडियावर व्हायरल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement