अजब प्रकरण! तिकडे मुलगा पैसे कमवायला घराबाहेर गेला, इकडे सासूने सुनेचं बॉयफ्रेंडसोबत लावलं लग्न

Last Updated:

एका सासूने मात्र चक्क आपल्या सुनेचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं आहे. मुलगा हयात नसता तर ठिक आहे. पण मुलगा पैसे कमवयाला घराबाहेर पडला आणि आईने असं केलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

News18
News18
पाटणा : मुलांचं लग्न म्हणजे पालकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण असतो. विशेषतः वरमाई सुनेला घरी आणण्यासाठी उत्सुक असते. असं असताना एका सासूने मात्र चक्क आपल्या सुनेचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं आहे. मुलगा हयात नसता तर ठिक आहे. पण मुलगा पैसे कमवयाला घराबाहेर पडला आणि आईने असं केलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बिहारच्या बेगुसरायमधील हे प्रकरण आहे. पाटला टोल लखनपूरपासून येथे राहणारे हरे राम साह यांची मुलगी अर्पण कुमारी हिचं तीन वर्षांपूर्वी अमित कुमार पासवान नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. अपर्णा कुमारी ही साह समाजाची होती तर अमित कुमार पासवान समाजाचा होता. दोघांची जात वेगळी होती, त्यामुळे कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही. अपर्णाचं लग्न दुसरीकडे लावून दिलं.
advertisement
पण दरम्यानच्या काळात या दोघांमधील प्रेम आणखी वाढत गेलं. दोघंही एकमेकांशी गुपचूप फोनवर बोलत. याच काळात अपर्णा कुमारीने एका मुलाला जन्म दिला. काही काळानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अर्पणचा पती चंदन साह दुसऱ्या राज्यात मजूर म्हणून काम करण्यासाठी गेला. त्याच वेळी अर्पण कुमारीचा प्रियकर अमित कुमार देखील बेगुसरायमधील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता. त्यांचं भेटणं सुरू झालं. एके दिवशी दोघंही जत्रेला गेले. तिथं हात धरून फिरत होते.
advertisement
अपर्णाच्या गावातील लोकांनी त्या दोघांना पाहिलं. दोघांनाही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद केलं. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. कुटुंबातील सदस्य तिथं पोहोचताच दोघांनाही खोल्यांमधून बाहेर काढलं. मग काही गावकऱ्यांनी तर प्रेमीयुगुलांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. यावेळी प्रेमी युगुलांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्नही केला. दोघांमधील प्रेम पाहून गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करणं थांबवलं.
advertisement
अपर्णा म्हणाली, मला फक्त अमित आवडतो. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझं लग्न चंदनशी लावून दिलं. हे ऐकून गावकऱ्यांनी ठरवलं की अपर्णाचं लग्न अमितशी लावून द्यावं. त्यानंतर, मुलीच्या सासू आणि मुलाच्या पालकांच्या संमतीने दोघांचं लग्न झालं. आता या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे
मराठी बातम्या/Viral/
अजब प्रकरण! तिकडे मुलगा पैसे कमवायला घराबाहेर गेला, इकडे सासूने सुनेचं बॉयफ्रेंडसोबत लावलं लग्न
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement