20 पुरुषांशी लग्न, तरी महिला व्हर्जिन, सुहागरातची ती स्टोरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding news : काही लोक फक्त समाजासाठी लग्न करतात तर काही सामाजिक दबावाखाली लग्न करतात. यामुळेच काही ठिकाणी लग्न हा विधी न होता विनोद बनला आहे. अशाच एका लग्नाची कहाणी.
नवी दिल्ली : लग्न हे अनेक जन्मांचं नातं आहे आणि ते करण्यापूर्वी माणसाला त्याचा चांगला विचार करावा लागतो आणि समजून घ्यावं लागतं. पण आता बदलत्या काळानुसार या नात्याचा अर्थही बदलला आहे. काही लोक फक्त समाजासाठी लग्न करतात तर काही सामाजिक दबावाखाली लग्न करतात. यामुळेच काही ठिकाणी लग्न हा विधी न होता विनोद बनला आहे. अशाच एका लग्नाची कहाणी.
चीनमध्ये राहणारी तरुणी, काओ मेई असं तिचं नाव. तिनं 20 वेळा लग्न केलं. 20 वेळा ती नवरी बनली. पण तरी ती तरुणीच आहे. 20 लग्ने केली असली तरी ती अजूनही अविवाहित आहे. पण आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, काओफक्त दिखाव्यासाठी वधू बनते. तिच्यासाठी लग्न एखाद्या मालिकेत काम करण्यासारखं आहे आणि ती त्यातून पैसे कमवते. समाजाकडून येणाऱ्या लग्नाच्या दबावामुळे चिंतेत असलेल्यांसाठी ती वधू बनते. काओ 20 वर्षांची आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून हे काम करत आहे.
चेंगडू येथील रहिवासी असलेल्या काओने 2018 मध्ये मैत्रिणीची मैत्रीण असल्याचं भासवलं. यानंतर, तिने ते स्वतःचं काम बनवलं. ती अशा लोकांची मैत्रीण किंवा पत्नी बनते ज्यांना मदत करण्यासाठी सामाजिक दबाव असतो. गेल्या सात वर्षांत, तिने 20 लग्ने केली आहेत, ज्यामध्ये ती तिच्या क्लायंटसाठी वधू बनते.
advertisement
मुलगी लग्नाच्या कोणत्याही कायदेशीर अडचणीत अडकत नाही, ती फक्त समारंभात पत्नी आणि प्रेयसी म्हणून काम करते. तिने समारंभात वेडिंग ड्रेसदेखील घातला आहे आणि ती खूप एन्जॉय करताना दिसते. या कामासाठी काओ प्रति तास 1500 युआन म्हणजे जवळपास 18000 रुपये घेते. ती म्हणते की तिला या कामातून सामान्य कामापेक्षा खूप जास्त पैसे मिळतात. ती स्वतःला एक जीवन कलाकार म्हणवते, जी लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी काम करते.
Location :
Delhi
First Published :
April 06, 2025 9:01 AM IST