या पार्कमध्ये जॉगिंगसाठी मनाई, इतकंच नाहीतर चालण्यासाठीही कठोर नियम, बंगळुरूच्या पार्कचे विचित्र नियम

Last Updated:

बंगळुरूच्या इंदिरानगर पार्कमधील विचित्र नियम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. एका व्हायरल फोटोमध्ये लिहिल्यानुसार, पार्कमध्ये जॉगिंगसाठी परवानगी नाही. तसेच...

Bangalore jogging ban
Bangalore jogging ban
चांगल्या आरोग्यासाठी लोक व्यायाम आणि वर्कआउट करण्याचा सल्ला देतात आणि मेट्रो शहरांमध्ये लोक व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी जवळच्या पार्कमध्ये जातात. पण तुम्हाला कळलं की तुम्ही पार्कमध्ये जॉगिंग करू शकत नाही, तर? इतकंच नाही, तुम्हाला इथे चालण्यासाठीही नियम पाळावा लागेल? असाच एक प्रकार कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये समोर आला आहे. बेंगळुरूमधील एका पार्कमधील पोस्टर सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पार्कमधील नियम पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
चालण्यावरही बंदी
कथितपणे, हे पोस्टर बेंगळुरूमधील इंदिरानगर पार्कचे आहे, जे एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पार्कमधील पोस्टरमध्ये अनेक नियम लिहिलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जॉगिंगला बंदी आहे. इतर नियमांबद्दल बोलायचं झालं, तर कोणत्याही प्रकारच्या गेमिंग ऍक्टिव्हिटीवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वात आश्चर्यकारक नियम म्हणजे लोक फक्त एकाच दिशेने चालू शकतात. व्हायरल बोर्डवर सूचना आहे की लोक पार्कमध्ये फक्त घड्याळाच्या दिशेने (clockwise) चालू शकतात.
advertisement
नेटकरी देताहेत प्रतिक्रिया
प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने आश्चर्याने लिहिलं, "तुम्ही विनोद करत आहात, बरोबर? इंदिरानगर पार्कमध्ये जॉगिंग नाही? पुढे काय होईल? पार्कमध्ये वेस्टर्न कपडे नाहीत? पार्कमध्ये जॉगिंग करण्यात काय अडचण आहे?" तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "बंगलोरमध्ये सार्वजनिक जागांची कमतरता ही एक समस्या आहे, पण दुसरी समस्या ज्याबद्दल बोललं जात नाही ती म्हणजे या प्रकारची नैतिक पोलिसिंग." आणखी एका युजरने लिहिलं, "आश्चर्य आहे, जर कोणी अचानक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करायला लागलं तर काय होईल?"
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
या पार्कमध्ये जॉगिंगसाठी मनाई, इतकंच नाहीतर चालण्यासाठीही कठोर नियम, बंगळुरूच्या पार्कचे विचित्र नियम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement