advertisement

VIDEO : ताजी हवा खाण्यासाठी व्यक्तीनं डोकं खिडकीतून काढलं बाहेर, नंतर घडलं भयंकर!

Last Updated:

भरपूर लोक सर्वाजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे बस, ट्रेन, ऑटो, अशा सार्वजनिक प्रवाशी वाहनांमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते.

 ताजी हवा खाणं व्यक्तीला पडलं महागात
ताजी हवा खाणं व्यक्तीला पडलं महागात
नवी दिल्ली : भरपूर लोक सर्वाजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे बस, ट्रेन, ऑटो, अशा सार्वजनिक प्रवाशी वाहनांमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते. सार्वजनिक प्रवासामध्ये आपल्याला विंडो सीट मिळावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी मग वादही घालायला कमी करत नाही. खिडकीजवळ जागा असल्यामुळे ताजी हवा आणि बाहेरचं दृश्य पहायला मिळतं. खिडकीच्या जागेवरुन भांडणाचे बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. मात्र यावेळी विचित्र घटना समोर आली. खिडकीवर बसलेल्या व्यक्तीसोबत जो प्रकार घडला तो भयंकर होता.
एक व्यक्ती बसच्या खिडकीच्या सीटवर बसतो. ताजी हवा खाण्यासाठी तो तोंड खिडकीतून बाहेर काढतो मात्र त्याचं डोकं बाहेरच निघत नाही. खिडकीत त्या प्रवाश्याचं डोकं अडकून राहतं. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.
प्रवाश्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बस थांबली असून आजूबाजूला बरीच गर्दी जमलीय. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाश्याचं डोकं खिडकीत अडकलंय. बरेच लोक प्रयत्न करुन त्याचं अडकलेलं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळानं व्यक्तीची सुटका होते आणि त्याचं अडकलेलं डोकं खिडकीतून निघतं.
advertisement
advertisement
व्हायरल होत असलेलं हे प्रकरण आंध्र प्रदेशातील असल्याचं म्हटलं जात आहे. @AadhanTelugu नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : ताजी हवा खाण्यासाठी व्यक्तीनं डोकं खिडकीतून काढलं बाहेर, नंतर घडलं भयंकर!
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement