दर 20 तासात 1 मृत्यू! या प्राण्याला स्पर्श केला तरी जाईल जीव
- Published by:Priya Lad
Last Updated:
सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सुमारे 500 जीवाचा बळी गेला आहे. त्यामुळे आता मोठं पाउल उचलण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : आपला हौस भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. यामुळेच त्यांनी वर्षानुवर्षे केवळ स्वत:च्या फायद्यासाठी मुकी जनावरं मारली आहेत. असे अनेक देश आहेत जिथं वन्य प्राणी त्यांच्या त्वचेसाठी, हाडांसाठी, शिंगे किंवा दातांसाठी जवळजवळ दररोज मारले जातात. त्यापैकी च हा एक प्राणी. पण आता या प्राण्याला स्पर्शही करणं धोकादायक ठरेल. जो कोणी त्याला हात लावेल त्याचा जीव जाईल.
दक्षिण आफ्रिकेत गेंड्यांना त्यांच्या शिंगांसाठी मारले जातं. जोहान्सबर्गच्या विट्स विद्यापीठाचे संचालक जेम्स लार्किन यांनी सांगितलं की दक्षिण आफ्रिकेत दर 20 तासांनी एक गेंडा त्याच्या शिंगामुळे मारला जातो. गेंड्याची शिंगे काळ्या बाजारात सोने, चांदी आणि हिऱ्यांपेक्षा जास्त किमतीत विकली जातात. ते आशियातील अनेक औषधांसाठी वापरले जातात किंवा लोक गेंड्याची शिंगे इतरांना भेट म्हणून देतात.
advertisement
डेली स्टारच्या म्हणण्यानुसार, सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सुमारे 500 गेंड्यांची कत्तल करण्यात आली होती.
आता गेंड्याना हात लावणार्याचा मृत्यू
पण आता दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी तस्करांना रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता त्यांनी गेंड्याच्या शिंगाला हात लावला तर त्यांचा जीव जाईल. दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव राखीव क्षेत्रात सुमारे 20 गेंड्यांच्या शिंगांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ बसवण्यात आले आहेत. हे किरणोत्सर्गी पदार्थ मानवांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. गेंड्याच्या शिंगासह हा पदार्थ मानवाने सेवन केल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. या पदार्थाचा वापर करून तस्करीची शिंगेही शोधली जाऊ शकतात.
advertisement
तस्करी रोखण्यासाठी प्रभावी पद्धत
गेंड्याच्या शिंगाची किंमत त्याच्या अंतिम खरेदीदाराच्या दृष्टीने कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे, ज्यामुळे त्याची मागणी कमी होईल. यासोबतच सीमा ओलांडून विकल्या जाणाऱ्या तस्करीचे शिंग पकडणं सोपं जातं.
दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतातील गेंड्याच्या अनाथाश्रमात काम करणारे एरी व्हॅन डेव्हेंटर म्हणाले की, कदाचित ही पद्धत तस्करी रोखण्यासाठी प्रभावी ठरेल.
Location :
Delhi
First Published :
July 01, 2024 7:53 AM IST