भारतातील ती खास मिठाई; जी चवीसाठी प्रसिद्ध, पण तिचं नाव घेतलं तरी मागे पळून पळून मारतील लोक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या मिठाईची चव अनोखी असते. मात्र याशिवायं त्याचं नाव देखील इतकं अनोखं आहे की ते लोकांचं लक्ष वेधून घेतं.
जयपूर : भारतातील लोकांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखायला भरपूर आवडतं. म्हणूनच इथे वेगवेगळ्या राज्यातच नाही तर अगदी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतही काहीतरी अनोखी खाद्य संस्कृती किंवा पदार्थ असतात. हे पदार्थ इतके प्रसिद्ध असतात, की देशभरातील लोक यांची चव चाखण्यासाठी येतात. या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आणि अनोखी असते. मात्र, एका पदार्थाला प्रत्येक राज्यात पसंती मिळते, ती म्हणजे मिठाई. यातही अनेक प्रकार असतात. अनेकजण जेवणानंतर न चुकता मिठाई खातात
भारतात तुम्हाला गुलाब जामुनपासून ते जलेबी, रबडी, रसगुल्ला, मालपुआ आणि इतर अनेक प्रकार मिळतील. प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक राज्याच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला राजस्थानच्या जोधपूरच्या एका खास गोड पदार्थाबद्दल सांगणार आहोत. या मिठाईची चव अनोखी असते. मात्र याशिवायं त्याचं नाव देखील इतकं अनोखं आहे की ते लोकांचं लक्ष वेधून घेतं.
advertisement
आम्ही बोलत आहोत जोधपूरच्या प्रसिद्ध चुटिया चक्कीबद्दल. या मिठाईची चव अप्रतिम आहे. बेसन भाजून बनवलेल्या या मिठाईचं अक्षरशः लोकांना वेड लागलं आहे. ही गोड तुपात तयार केली जाते. बेसनाला तुपात तोपर्यंत भाजलं जातं, जोपर्यंत ते बर्फीसारखं दिसत नाही. ही मिठाई खरेदी करण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागतात. ही मिठाई 500 रुपये किलोने विकली जाते.
advertisement
ही मिठाई केवळ चवीसाठीच नाही तर नावासाठीही प्रसिद्ध आहे. चुटिया चक्कीसारखं अनोखं नाव लोकांचं लक्ष वेधून घेतं. विशेषत: जोधपूरच्या देशी मिठाईमध्ये या मिठाईच्या खरेदीसाठी अक्षरशः लोकांची चढाओढ आहे. या दुकानांत संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला ही मिठाई मिळणार नाही. कारण ती बनवताच काहीच वेळात संपून जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 02, 2024 10:58 AM IST
मराठी बातम्या/Viral/
भारतातील ती खास मिठाई; जी चवीसाठी प्रसिद्ध, पण तिचं नाव घेतलं तरी मागे पळून पळून मारतील लोक