Rapido Rider Harassment : 'प्लीज भैय्या मत करो...' रॅपिडो रायडरचं तरुणीसोबत विकृत कृत्य, Video पाहून डोक्यात जाईल सनक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजता घडली, पोलिसांनी आरोपी राइडरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपीचं नाव लोकेश असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : आजकाल शहरांमध्ये प्रवास सोपा करण्यासाठी कॅब बुकिंग आणि बाईक राईडिंग अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. या सेवांमुळे लोकांना जलद, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळते. शिवाय शहरातील ट्राफिक पाहाता बस किंवा ऑटो, टॅक्सिने वेळेवर पोहोचणं अशक्य आहे, अशा परिस्थितीत बाईक हा सगळ्यात चांगला पर्याय ठरते. पण याच सेवांमधून काही वेळा प्रवाशांना अतिशय त्रासदायक आणि भीतीदायक अनुभवांनाही सामोरं जावं लागतं. अशाच एका धक्कादायक घटनेत एका युवतीने रॅपिडो बाईक राइडरवर प्रवासादरम्यान तिच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजता घडली, पोलिसांनी आरोपी राइडरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपीचं नाव लोकेश असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राइडदरम्यानचा धक्कादायक अनुभव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती चर्च स्ट्रीटवरून आपल्या पीजीकडे परतत होती. प्रवासादरम्यान अचानक रॅपिडो चालक लोकेशने बाईक चालवत असतानाच तिच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला युवतीला काय होतंय हेच कळलं नाही, पण जेव्हा राइडरने पुन्हा असंच केलं तेव्हा तिने घाबरून म्हणाली, “भैया, मत करो...” पण ती अनोळखी परिसरात असल्याने तिने लगेच बाइक थांबवली नाही.
advertisement
घटनेनंतर युवतीने आपला अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने लिहिलं, “मी खूप घाबरले होते, मला स्वतःला पूर्णपणे असुरक्षित वाटलं. मी फक्त एवढंच इच्छिते की कोणत्याही मुलीला असा अनुभव कधी येऊ नये. मग ती कॅबमध्ये असो वा बाईकवर.” तिने पुढे सांगितलं की, असं वर्तन तिला आधीही अनुभवायला मिळालं होतं, पण या वेळी तिने गप्प न राहता आवाज उठवायचं ठरवलं. तिची पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आणि पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली.
advertisement
"Bhaiya kya kar rhe ho, mat karo.."⚠️🚨
A woman alleged harassment by a Rapido driver in Bengaluru after she booked a ride. She alleged that driver was grabbing her leg while riding. She posted on Instagram;
⚠️ Trigger warning: Harassment Today, 06.11.2025, in Bengaluru… pic.twitter.com/rDLITAcjgv
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) November 8, 2025
advertisement
घटनेनंतर युवती आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर एका प्रवाशाने तिच्या चेहऱ्यावरचा ताण पाहून विचारपूस केली. संपूर्ण गोष्ट समजल्यानंतर त्याने राइडरला सामोरे जात विचारले असता, आरोपीने माफी मागितली. मात्र जाताना त्याने हाताने इशारा करून दाखवला, ज्यामुळे युवती अजूनही घाबरली. पोलिसांनी विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Rapido Rider Harassment : 'प्लीज भैय्या मत करो...' रॅपिडो रायडरचं तरुणीसोबत विकृत कृत्य, Video पाहून डोक्यात जाईल सनक


