असा मासा ज्याला आहेत हात, यावरच तो चालतोही; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
हात असलेल्या या दुर्मिळ माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : मासा म्हटलं की त्याला एक छोटी शेपटी, कल्ले, पंर इत्यादी भाग आले. पण एक असा मासा आहे, ज्याला हातही आहेत, असं सांगितलं तर... साहजिक तुम्हाला आश्चर्य वाटेल. किंबहुना विश्वासच बसणार नाही. पण हात असलेल्या या माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आश्चर्य म्हणजे हा मासा याच हातांवर चालतानाही दिसला.
तसे माशांचे बरेच प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. काही मासे इतके विचित्र असतात की आपण विचारही करू शकत नाही. अशाच माशांपैकी हा एक मासा. ज्याला हात आहेत. हा मासा अत्यंत दुर्मिळ आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी असा मासा दिसला होता. 20 वर्षांनंतर पुन्हा तो दिसल्याने सर्वजण थक्क झाले आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलियातील तस्मानियामध्ये हा विचित्र मासा सापडला. हा मासा केरी यारे नावाच्या महिलेला सापडला आहे. ती प्राइमरोझ सँड टाऊनमध्ये बीचवर गेली होती. तेव्हा तिची नजर या माशावर पडली. माशाला असलेले हात पाहून तिला आश्चर्य वाटलं. मिररच्या रिपोर्टनुसार, ती म्हणाली, 'ते लहान पफरफिश किंवा टॉडफिशसारखे दिसत होते, जे मी खूप पाहिले आहे, परंतु जेव्हा मी जवळून पाहिलं तेव्हा वाळूच्या थराखाली, मला त्याचा लहान हात दिसला. तो नक्कीच एक आश्चर्यकारक क्षण होता.
advertisement
हा स्पॉटेड 'हँडफिश' आहे. ज्याला हात आहेत आणि चालण्यासाठी तो आपले हात वापरतो. माशांची ही अत्यंत धोकादायक प्रजाती समुद्राच्या तळावर चालण्यासाठी आपले हात वापरते. हे मासे स्थानिक पातळीवर नामशेष झाल्याचं मानलं जात होतं.
कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनचे कार्ली डिव्हाईन म्हणाले, हा मासा सापडण्यापूर्वी आम्हाला वाटलं की प्राइमरोझ सॅन्ड्समधील हा स्पॉटेड हँडफिश नामशेष झाला आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही हा मासा शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण आम्हाला एकही मासा सापडला नाही. पण आता आम्हाला ते पुन्हा एक्सप्लोर करण्यासाठी पुरावा मिळाला.
advertisement
Spotted: a handfish!
Last weekend, a runner found a critically endangered spotted handfish (Brachionichthys hirsutus) in Tasmania. Unfortunately the fish was dead, but it's exciting evidence of life of a population we'd thought was locally extinct since 2005. pic.twitter.com/UzYHVZeTcO
— CSIRO (@CSIRO) September 10, 2023
advertisement
सीएसआयआरओने या माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Location :
Delhi
First Published :
Sep 16, 2023 11:27 PM IST
मराठी बातम्या/Viral/
असा मासा ज्याला आहेत हात, यावरच तो चालतोही; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO






