Deadly Sign : वाळूत हे निशाण दिसले तर लगेच पळून जा! मृत्यू कधीही कवटाळू शकतो

Last Updated:

Deadly Snake Sign in Sand : निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. यापैकी बहुतेक धोके आधीच ओळखता येतात. अशाच एका मृत्यूच्या धोक्याबद्दल इशारा देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18
News18
नवी दिल्ली : निसर्गाच्या सौंदर्यात धोके लपून बसलेले असतात. वाळवंटासारख्या भूप्रदेशात हे धोके आणखी प्राणघातक ठरू शकतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की, जर तुम्हाला वाळवंटात हे चिन्ह दिसलं तर पळून जा! हे एस-आकाराचे चिन्ह आहे. एस आकाराचं हे चिन्ह वाळूमधील नमुने नाहीत, तर जगातील सर्वात वेगवान आणि सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या साइडवाइंडर म्हणजे क्रोटलस सेरास्टेसच्या खुणा आहेत.
उत्तर अमेरिकेतील सोनोरन आणि मोजावे वाळवंटात आढळणाऱ्या या सापाची विशिष्ट बाजूने फिरण्याची हालचाल म्हणजे वाळूतून वेगाने सरकण्याचं त्याचं रहस्य. पण जर तुम्हाला नवीन खुणा दिसल्या तर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की जवळपास साप लपून बसला असेल आणि कधीही हल्ला होऊ शकतो. दरवर्षी वाळवंटातील अनेक लोक या धोकादायक सापांना बळी पडतात.
advertisement
वाळूमध्ये चालणं खूप कठीण असले तरी, हा साप वाळूमध्ये अगदी सहजपणे सरकतो.  व्हिडिओमध्ये दाखवल आहे की वाळूवर J किंवा S सारख्या खुणा तयार होतात, ज्या साइडवाइंडरच्या चालण्याने तयार होतात.  बीबीसी अर्थ आणि यूट्यूबच्या व्हिडिओंनुसार या सापाचं शरीर सामान्यपणे सरकण्याऐवजी दोन्ही बाजूला हलतं, ज्यामुळे वाळूला फक्त दोन बिंदू स्पर्श करतात. यामुळे वाळू सरकत नाही आणि साप ताशी 18 मैल वेगाने सरकू शकतो.
advertisement
advertisement
या सापाचे हेच वैशिष्ट्य त्याचा सर्वात मोठा धोका आहे. तो ओळखणे अत्यंत कठीण आहे. हा साप रात्री सक्रिय असतो आणि दिवसा वाळूमध्ये स्वतःला गाडतो. फक्त त्याचे डोळे दिसतात. त्याच्या चाव्यामुळे न्यूरोटॉक्सिन बाहेर पडतो, ज्यामुळे वेदना, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
कुठेही ऐकू आला तर जिथं असाल तिथून पळून जा; नाहीतर जाईल जीव
advertisement
हा आवाज जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक असलेल्या रॅटलस्नेकचा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या क्रोटलस म्हणून ओळखला जाणारा रॅटलस्नेक वाइपर कुटुंबातील आहे आणि जगभरात त्याच्या 36 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, ज्यामध्ये डायमंडबॅकपासून साइडवाइंडरपर्यंतचा समावेश आहे. त्यांची त्वचा अशी आहे की त्यांना शोधणं कठीण होतं.
रॅटलस्नेकच्या शेपटीच्या टोकावर केराटिनसारखे भाग असतात जे सतत वाढत असतात. जेव्हा सापाला भीती वाटते किंवा धोका वाटतो तेव्हा ते स्नायूंच्या आकुंचनातून कंपन करतात आणि 90 डेसिबल पर्यंतचा मोठा आवाज निर्माण करतात. घंटा वाजवल्यासारखा हा आवाज. जो भक्षकांना दूर ठेवण्यासाठी असतो, हल्ला दर्शवण्यासाठी नाही. बहुतेक रॅटलस्नेक शांत असतात. प्रथम ते इशारा देतात आणि नंतर चावतात.
advertisement
त्यांच्या आहारात उंदीर, ससे आणि पक्षी यांचा समावेश आहे. ते थर्मल सेन्सर्सद्वारे उष्णता ओळखून शिकार करतात. पण मानवांसाठी धोका म्हणजे त्यांचं विष. रॅटलस्नेक विष हे हेमोटॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिनचे मिश्रण आहे, जे ऊती नष्ट करतं. चावल्यानंतर लगेचच तीव्र वेदना, सूज आणि शरीर काळं होणं सुरू होतं. त्यानंतर रक्तस्त्राव सुरू होतो. श्वास घेण्यास त्रास होणं, स्नायू कमकुवत होणं, चक्कर येणं, उलट्या होणं ही लक्षणं दिसू लागतात. गंभीर प्रकरणांमध्ये किडनी निकामी होणं किंवा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
हे साप वाळवंट, गवताळ प्रदेश, जंगले आणि पर्वत अशा ठिकाणी राहतात. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील शुष्क प्रदेशात आढळतो. अमेरिकेत कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत त्यांचं वास्तव्य आहे. ते रात्री अॅक्टिव्ह असतात आणि दिवसा लपतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Deadly Sign : वाळूत हे निशाण दिसले तर लगेच पळून जा! मृत्यू कधीही कवटाळू शकतो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement