लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमुळे पृथ्वीवर घडू शकतो मोठा अनर्थ; वैज्ञानिकांच्या संशोधनात धक्कादायक माहिती

Last Updated:

शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आयुष्यातील 4.5 अब्ज वर्षांच्या काळात घडलेल्या घटना समजून घेण्यासाठी आणि ग्रहाच्या कक्षेत भूतकाळात झालेल्या बदलांचा अंदाज घेण्यासाठी सिम्युलेशनद्वारे विस्तृत संशोधन केलं.

लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमुळे पृथ्वीवर घडू शकतो मोठा अनर्थ
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमुळे पृथ्वीवर घडू शकतो मोठा अनर्थ
मुंबई :  कित्येक शतकांपासून माणसाचा असा विश्वास आहे की, ताऱ्यांचा पृथ्वीवर आणि माणसावर प्रभाव पडतो. याच आधारावर ज्योतिषशास्त्रचा वापर केला जातो. पण, आत्तापर्यंत विज्ञानाने या गोष्टींकडे फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नव्हतं. आता एका रिसर्चमध्ये असं निदर्शनास आलं आहे की, पृथ्वी आणि इतर ग्रहांवर अवकाशातील ताऱ्यांचा प्रभाव पडतो. शास्त्रज्ञांना असं आढळलं की, सूर्य आणि इतर ताऱ्यांचा पृथ्वीसह आपल्या सौर मंडळातील इतर ग्रहांवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांची कक्षा देखील बदलू शकते. ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर मोठा अनर्थ घडू शकतो.
‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या 'पासिंग स्टार्स अॅज अॅन इम्पॉर्टंट ड्रायव्हर ऑफ पॅलिओक्लायमेट अँड सोलार सिस्टीम ऑर्बिटर इव्होल्यूशन' नावाच्या स्टडीनुसार, लाखो वर्षांपूर्वी अशा प्रकारचे बदल ग्रहांच्या कक्षेत झाले आहेत. जेव्हाजेव्हा असं घडलं तेव्हा पृथ्वीचं तापमान आठ अंश सेल्सिअसने वाढलं होतं.
advertisement
या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, जेव्हा एखादा मोठा तारा ग्रहाच्या जवळून जातो तेव्हा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रहामध्ये थोडासा बदल होतो. परिणामी, त्या ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षासुद्धा बदलते. पृथ्वीच्या भूगर्भीय नोंदीवरून असं लक्षात येतं की, तिच्या कक्षेतील बदलांमुळे हवामानात बदल झाले आहेत.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आयुष्यातील 4.5 अब्ज वर्षांच्या काळात घडलेल्या घटना समजून घेण्यासाठी आणि ग्रहाच्या कक्षेत भूतकाळात झालेल्या बदलांचा अंदाज घेण्यासाठी सिम्युलेशनद्वारे विस्तृत संशोधन केलं. त्यांनी 28 लाख वर्षांपूर्वी घडलेली एक घटना निवडली. या घटनेत सूर्यासारखा एचडी 7977 नावाचा तारा सूर्यमालेजवळून गेला होता.
advertisement
हा तारा ऊर्ट ढगांमधून (ट्रान्स-नेपच्युनियन प्रदेशातील ढग) गेला होता. तो सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या अंतरापेक्षा जास्त अंतरावरून गेला होता. तो पृथ्वीपासून 31 हजार पट जास्त अंतरावर होता. तरीसुद्धा त्याचा खूप खोल परिणाम होऊ शकला असता. हे अंतर 31 ते 4 हजार पट असलं असतं. पृथ्वीच्या कक्षेत जेव्हा-जेव्हा बदल झाला आहे, तेव्हा पृथ्वीवर डूम्सडेसारख्या विनाशकारी घटना घडल्या आहेत, हे अगोदरच मान्य करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, भूतकाळातील नाही पण, भविष्यातील बदलांची अचूक गणना करून अशा घटनांचा अंदाज लावता येऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमुळे पृथ्वीवर घडू शकतो मोठा अनर्थ; वैज्ञानिकांच्या संशोधनात धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement