2024 Predictions : 'पुढच्या महिन्यात येणार खुशखबर', 'ही' भविष्यवाणी होऊ शकते खरी; पुरावाही दाखवलाय

Last Updated:

बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्यांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. आता एका टाइम ट्रॅव्हलरने दावा केला आहे की, जगाला पुढील महिन्यात अशी चांगली बातमी मिळणार आहे, ज्याची अनेक शतकांपासून जग वाट पाहत आहे.

टाइम ट्रॅव्हल
टाइम ट्रॅव्हल
Time Traveller Claims: आपल्याला भविष्य जाणून घ्यायचं असेल तर लोक अशा ज्योतिषाकडे जातात, जो ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचाली पाहून त्यांचे भविष्य सांगू शकतो. ज्या गोष्टी त्याने पाहिल्या नाहीत त्याबद्दल त्याला अधिक जाणून घ्यायचे असते हा मानवी स्वभाव आहे. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी भविष्य सांगते तेव्हा लोक त्याचे लक्षपूर्वक ऐकतात. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र व्यतिरिक्त, असे काही लोक आहेत जे जगाचे आणि आपले भविष्य शेकडो वर्षे पुढे सांगण्याचा दावा करतात. आता सोशल मीडियावरही असे दावे पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे.
तुम्ही बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांच्याबद्दल बरेच काही ऐकले असेल. ज्यांचे अनेक वर्षांपूर्वी केलेले भाकीत बरेचदा खरे ठरतात. ते कोणतंही टाइम ट्रॅव्हल होण्याचा दावा करत नव्हते. पण आजकाल काही लोक असा दावाही करत आहेत. अशाच एका टाइम ट्रॅव्हलने दावा केला आहे की, 647 वर्षे पुढचे जग पाहून तो परतला आहे. विशेष म्हणजे तो पुढील महिन्यात संपूर्ण जगासाठी एक आनंदाची बातमी देणार असल्याचंही बोललं जातंय.
advertisement
जानेवारी 2024 मध्ये चांगली बातमी येईल
मिररच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचे नाव एनो अलारिक आहे आणि त्याने @theradianttimetraveller नावाने त्याचे सोशल मीडिया अकाउंट तयार केलेय. या व्यक्तीने एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, त्याने 647 वर्षे पुढे म्हणजेच 2671 पर्यंतचे जग पाहिले आहे. त्याच्या दाव्यानुसार, मनुष्याला लवकरच अमरत्वाचे सूत्र सापडेल. यासाठी त्यांनी तारीख दिली आहे की 13 जानेवारी 2024 रोजी विज्ञानाला अमरत्वाचा फॉर्म्यूला सापडेल. जो स्पर्श करेल तो जीवनात अमर होईल. त्याने या क्रिस्टलचा फोटोही शेअर केला आहे पण वाईट गोष्ट म्हणजे त्याला स्पर्श केल्यावर सर्व भावना हळूहळू कमी होतील. त्यांचा हा दावा 26 हजारांहून अधिक फॉलोअर्सनी पाहिला आहे, त्यापैकी काही जण या क्रिस्टलची वाट पाहत आहेत, तर काहींनी म्हटले आहे की, मनुष्य अमर असणे योग्य नाही.
advertisement
आणखी अनेक विचित्र दावे
आपला मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी, व्यक्तीने तारखांसह भविष्यातील घटनांचा उल्लेख केला आहे. त्यात म्हटले आहे की 2 एप्रिल 2024 रोजी 9.8 रिश्टर स्केलचा भूकंप होईल आणि 750 फूट उंचीची त्सुनामी येईल. या भूकंपामुळे कॅलिफोर्निया किनारपट्टीचा मोठा भाग नष्ट होईल. एवढेच नाही तर 22 मे 2024 रोजी एक व्यक्ती एक लिक्विड तयार करेल, ज्याला स्पर्श केल्यावर त्याच्यावर पडलेल्या सावलीत जिवंत होईल. शास्त्रज्ञ या लिक्विडचे संपूर्ण सरोवर विकसित करतील. ज्याला द ग्रेट मिरर लेक म्हटले जाईल. ही भाकिते इतकी विचित्र आहेत की लोक विचारू लागले की यापैकी किती भाकिते आतापर्यंत खरी ठरली आहेत?
मराठी बातम्या/Viral/
2024 Predictions : 'पुढच्या महिन्यात येणार खुशखबर', 'ही' भविष्यवाणी होऊ शकते खरी; पुरावाही दाखवलाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement