Dance Video : आजोबांचा 'स्वॅग'च निराळा, खतरनाक 'डान्स' करत तरुणांनाही लाजवलं

Last Updated:

एका आजोबांनी लग्नात खतरनाक डान्स केला असून कार्यक्रमातील लाईमलाईट ओढून घेतली. तुम्हीही आजोबांचा स्वॅग पाहून थक्क व्हाल.

आजोबांचा खतरनाक डान्स व्हिडीओ
आजोबांचा खतरनाक डान्स व्हिडीओ
नवी दिल्ली, 7 डिसेंबर : सध्या लग्नसराईचा सीझन सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र लग्नाची धूम पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर लग्नातील अनेक घटना, फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधतोय. यामध्ये एका आजोबांनी लग्नात खतरनाक डान्स केला असून कार्यक्रमातील लाईमलाईट ओढून घेतली. तुम्हीही आजोबांचा स्वॅग पाहून थक्क व्हाल.
एका कार्यक्रमातील आजोबांचा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय. त्यांचा मनसोक्त अंदाज आणि हटके स्टाईल सर्वांचं मन जिंकत आहे. एवढंच नव्हे तर या वृद्ध आजोबांनी कार्यक्रमात सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि खतरनाक डान्स केला.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण मस्त डान्स करत असते. मग स्टेजवर आजोबा येतात आणि आपला खतरनाक डान्स करायला सुरुवात करतात. त्यांचा हा डान्स पाहून तरुणही चकित होतात आणि त्यांना चिअर-अप करतात. आजोबाही मोठ्या उत्साहानं डान्स स्टेप करु लागतात. तेवढ्यात एक आजी म्हणजे त्यांची बायको त्यांना थांबवण्यासाठी येतात मात्र आजोबा त्यांचंही ऐकत नाहीत. ते बेधुंद होऊन गाण्यावर थिरकतात.
advertisement
@ChapraZila नावाच्या ट्विटर अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. भोजपूरी गाणं व्हिडीओमध्ये ऐकायला मिळतंय त्यावर आजोबांचा खतरनाक डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंटचा पाऊस केला आहे.
advertisement
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून वय हा फक्त आकडा असतो याचं उदाहरण पहायला मिळतं. कारण वय झालं तरीही तुम्ही बेभान होऊन काही गोष्टींचा आनंद घेऊ शकता. आपल्या मनाप्रमाणं मजेत आयुष्य जगू शकता. कोणी काहीही म्हटलं तरी पर्वा न करता एन्जॉय करु शकता.
मराठी बातम्या/Viral/
Dance Video : आजोबांचा 'स्वॅग'च निराळा, खतरनाक 'डान्स' करत तरुणांनाही लाजवलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement