VIDEO: रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी बाईकवरून जाताना शंतनूला अडवलं, पोलिसांनी विचारलं 'तू कोण?'

Last Updated:

ज्येष्ठ बिझनेसमन रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने मोठी शोककळा पसरलेली. गुरुवारी दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी बाईकवरून जाताना शंतनूला अडवलं
रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी बाईकवरून जाताना शंतनूला अडवलं
मुंबई : ज्येष्ठ बिझनेसमन रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने मोठी शोककळा पसरलेली. गुरुवारी दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होती. रतन टाटांच्या अंत्ययात्रेतून शंतनू नायडू देखील सहभागी झाले होते. यावेळीचा त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये पोलिसांनी त्यांना थांबवलेलं पहायला मिळालं. नेमकं काय घडलं?
रतन टाटांच्या अंत्ययात्रेतील शंतनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी शंतनू नायडूला अडवून त्यांची ओळख विचारत आहेत. गाडी का घेऊन जात आहेत याविषयी पोलीस चौकशी करताना दिसत आहेत. फुटेजमध्ये शंतनू अगदी शांतपणे सांगत आहेत की, अंत्ययात्रेमध्ये सामील होणार आहेत. पोलीस आणि शंतनू दोघांचेही लोक कौतुक करत आहेत. आपापल्या ड्युटीज चोखपणे करत असल्याविषयी लोकांना व्हिडिओवर भरपूर कमेंट केल्या आहेत.
advertisement
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते ''अलविदा, माझे लाइटहाऊस''. रतन टाटांच्या शंतनू खूप जवळ होते. रतन टाटांच्या वाढदिवशीचा त्यांचा वाढदिवस साजरा करताना शंतनू त्यांच्यासोबत दिसला होता. तो व्हिडिओही सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आला होता.
advertisement
दरम्यान, 29 वर्षीय शंतनूला रतन टाटांनी 2022 मध्ये कामावर घेतले होते. टाटा ट्रस्टमधील कामाशिवाय ते त्यांच्या युनिक आणि चांगल्या आयडियांसाठी ओळखले जातात. शंतनू गुडफेलो स्टार्टअपचा मालक देखील आहे. ही कंपनी ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य पुरवते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
VIDEO: रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी बाईकवरून जाताना शंतनूला अडवलं, पोलिसांनी विचारलं 'तू कोण?'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement