Simpsons Prediction 2025 : 16 जानेवारीला जगावर मोठं संकट! सिम्पसन्सची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरणार? काय घडणार?

Last Updated:

एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये इन्फ्लुएन्सर सिम्पसन्स कार्टुनचा संदर्भ देत 16 जानेवारी 2025 ला येणाऱ्या संकटाबाबत सांगितलं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आजवर ज्या ज्या काही भयंकर घटना घडल्या, त्यांची भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती, असे दावेही व्हायरल झाले. यात बाबा वेंगा, नास्त्रेदामस यांच्यासोबत सिम्पसन्स या कार्टुनचाही समावेश आहे. सिम्पसन्स कार्टुनमध्ये दाखवलेले सीन्स भविष्यात प्रत्यक्षात उतरले असं सांगितलं जातं. आता याच कार्टुनमधील आणखी एक भविष्यवाणी खरी ठरते की काय अशी भीती व्यक्त केली जाते आहे. धक्कादायक म्हणजे ही भविष्यवाणी 16 जानेवारीबाबत आहे.
एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये इन्फ्लुएन्सर सिम्पसन्स कार्टुनचा संदर्भ देत 16 जानेवारी 2025 ला जगावर येणाऱ्या संकटाचा दावा करतो. आता हे संकट कोणतं, हे जाणून घेण्याची घाई तुम्हाला असेल.
advertisement
या इन्फ्ल्युएसरनं सांगितलं की, द सिम्पसनच्या एका एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलं होते की 16 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जगाला इंटरनेट ब्लॅकआउटचा सामना करावा लागेल सिम्पसन्स भविष्याचा अचूक अंदाज लावण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे या दाव्याबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा सुरू आहे.
advertisement
दरम्यान या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.  काही लोक जागतिक आउटेजचा दावा करत आहेत, तर काही लोक म्हणतात की ते फक्त अमेरिकेपुरते मर्यादित असेल. काहींनी या रिलची खिल्ली उडवली आहे. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
व्हिडिओच्या काही आवृत्त्यांमध्ये असेही जोडले गेले आहे की पांढऱ्या शार्कने पाण्याखालील केबल चघळल्याने आउटेज होऊ शकते. एक युझर म्हणाला, 'रिचार्ज 16 जानेवारीला संपणार आहे.' तर दुसरा म्हणाला, 'मी घरून काम करतो. तर तिसरा म्हणाला, मी रजेवर आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Simpsons Prediction 2025 : 16 जानेवारीला जगावर मोठं संकट! सिम्पसन्सची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरणार? काय घडणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement