Strange hotel: 'या' हॉटेलमध्ये ग्राहकांचा होतो अपमान, तरीही लोक करतात गर्दी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येक ठिकाणची आपली एक ओळख किंवा स्टाईल असते जी लोकांना आपल्या खेचत असते. माहोल पाहून अनेकजण जात असतात. तुम्ही अशा अनेक वेगवेगळ्या, हटके रेस्टॉरंट आणि हॉटेल, कॅफेविषयी ऐकलं असेल.
नवी दिल्ली : प्रत्येकजण बाहेर फिरण्यासाठी गेल्यावर किंवा कामानिमित्त गेल्यावर बाहेर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी जातात. काहीजण वेगवेगळ्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जातात. प्रत्येक ठिकाणची आपली एक ओळख किंवा स्टाईल असते जी लोकांना आपल्या खेचत असते. माहोल पाहून अनेकजण जात असतात. तुम्ही अशा अनेक वेगवेगळ्या, हटके रेस्टॉरंट आणि हॉटेल, कॅफेविषयी ऐकलं असेल. मात्र अशा रेस्टॉरंटविषयी माहितीय का, जिथे कर्मचारी ग्राहकांचा अपमान करतात मात्र तरीही लोक मोठ्या संख्येनं या रेस्टॉरंटमध्ये जातात.
हे वाचूनच कदाचित तुम्हाला विचित्र वाटलं असेल मात्र असं रेस्टॉरंट आहे जिथे कर्मचारी ग्राहकांनाना वाईट वागणूक देतात तरीही या रेस्टॉरंटला गर्दी असते. हे ठिकाण नेमकं आहे तरी कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याविषयी जाणून घेऊया.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या हॉटेलमध्ये पैसे घेऊनही ग्राहकांशी गैरवर्तन केलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहक हा अपमान शांतपणे सहन करतात. इथल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना काहीही म्हणणे म्हणजे आणखी अपमान. जर तुम्ही असा विचार करत असाल की ते स्वतःच्या इच्छेने हे करतात तर तुम्ही चुकीचे आहात. कर्मचारी त्यांच्या इच्छेने लोकांचा अपमान करत नाहीत, उलट त्यांचा अपमान केल्याबद्दल त्यांना मोबदलाही मिळतो.
advertisement
हे हॉटेल बर्नेट, लंडन येथे आहे आणि 'केरेन्स हॉटेल' म्हणून ओळखलं जातं. येथील एका रात्रीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये आहे. पूर्वी हे हॉटेल रेस्टॉरंट होतं, मात्र आता त्याचं हॉटेलमध्ये रूपांतर झालं आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांचा खाण्याबरोबरच अपमान केला जातो. पाहुण्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी मागितले तरी त्यांना स्वतः सिंकमधून पाणी घेण्यास सांगितलं जातं. वेटर जेवणाच्या ताट ग्राहकांच्या दिशेने फेकतात आणि काहीवेळा अत्यंत उद्धटपणे त्यांच्याकडून अन्न हिसकावून घेतात. येथे येणाऱ्यांना टॉवेल, टॉयलेट रोल किंवा मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत. सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलवाले स्वतःला जगातील सर्वात वाईट हॉटेल म्हणून जाहिरात करतात.
advertisement
दरम्यान, अशी अनेक निरनिराळी ठिकाण आहेत जिथे अनेक विचित्र गोष्टी केल्या जातात आणि लोकांना याविषयी वाईट देखील वाटत नाही. उलट ते त्याचे आभार मानतात किंवा त्याबदल्यात पैसै देतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2024 9:48 PM IST









