देशाच्या कोपऱ्यात अशीही गावं, जिथं होळी खेळल्यावर पडतो मृत्यूचा सडा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जेव्हा संपूर्ण देश होळीच्या रंगात न्हाऊन निघत असतो, घराघरात गोडाधोडाच्या पदार्थांचा घमघमाट असतो. तेव्हा इथला चिटपाखरूही उत्साहात दिसत नाही.
सोनिया मिश्रा, प्रतिनिधी
रुद्रप्रयाग : जेव्हा देशभरातील नागरिक मोठ्या उत्साहाने होळी सणाची वाट पाहत असतात, तेव्हा देशातच काही गावं अशी आहेत जिथं होळीचं नावही तोंडात घेतलं जात नाही. असं म्हणतात की, इथं जेव्हा जेव्हा कोणी होळीला रंग खेळलं तेव्हा तेव्हा गावात मृत्यूचा सडा पडला. त्यामुळे कोणीच इथं एकमेकांना रंग लावण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे आता इथल्या कॅलेंडरमध्ये जणू होळी सण नसतोच.
advertisement
या तीन गावांचं नाव आहे क्वीली, कुरझण आणि जौंदला. जे वसले आहेत उत्तराखंड राज्यात. जेव्हा संपूर्ण देश होळीच्या रंगात न्हाऊन निघत असतो, घराघरात गोडाधोडाच्या पदार्थांचा घमघमाट असतो. तेव्हा इथला चिटपाखरूही उत्साहात दिसत नाही. होळीचे दोन दिवस म्हणजे इथल्या नागरिकांसाठी सामान्यापेक्षा अतिसामान्य दिवस असतात.
हेही वाचा : उन्हात कोल्डड्रिंक पिता? सावधान! वरून थंड वाटतं पण आतून शरीर पोखरतं – News18 मराठी (news18marathi.com)
advertisement
होळी खेळल्यानंतर पसरली होती रोगराई!
गावकऱ्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'आम्हाला हा सण आवडत नाही, असं नाही किंवा तो साजरा करण्यालाही आमचा विरोध नाही. हा सण आनंदाचा आहे, परंतु आम्ही जेव्हा जेव्हा तो खेळलो तेव्हा तेव्हा आमच्या वाट्याला दुःखच आलं. अनेकजणांनी ही निव्वळ एक अंधश्रद्धा आहे, असं मानून नव्याने होळी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे परिणाम वाईटच पाहायला मिळाले. जेव्हा जेव्हा आमच्या गावात हा सण साजरा झाला, तेव्हा तेव्हा संपूर्ण गावात रोगराई पसरली.
advertisement
दरम्यान, असं का होतं, याचं कोडं आजवर कोणालाही उलगडलेलं नाही. काहीजण म्हणतात, हा देवाचा कोप आहे, तर काहीजण म्हणतात, केमिकलयुक्त रंग वापरल्यामुळे आजारपण पसरलं असावं. परंतु कारण काहीही असलं तरी आता मात्र कोणीच स्वतःवर अडचण ओढवून घ्यायला तयार नाही. त्यामुळे इथले लोक होळी आणि धूलिवंदनापासून दूरच राहतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Rudraprayag,Uttarakhand
First Published :
March 25, 2024 8:23 PM IST