2 पायांवर उभा राहिला वाघ, व्यक्तीला वाटलं कौतुक; प्रेमाने मिठी मारली आणि पुढे घडलं असं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून काहींनी त्या व्यक्तीच्या धैर्याला सलाम केला.
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : प्राण्यांशी खेळू नये आणि विशेषतः सिंह किंवा वाघ सारखे प्राणी समोर असतील तर त्यांच्याशी कधीही खेळू नये असे म्हणतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाघाशी खेळत असताना असं काही घडलं, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल, हा व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर खूप पाहिला जात आहे आणि लोक त्यावर कमेंटही करत आहेत. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती वाघासोबत खूप धमाल करत आहे पण अचानक असे काही घडते जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ 27 ऑक्टोबरला '@nouman.hassan1' इनस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख 38 हजार व्ह्यूज आणि 13 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत वाघ दोन पायांवर उभा असल्याचं दिसत आहे. माणूस ज्याला मिठी मारतोय, यात तुम्ही बघू शकता की, वाघ माणसाच्या जवळ जाऊन त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो माणूस वाघाला स्वतःपासून कसं दूर ढकलतो.
advertisement
असे व्हिडिओ सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होतात आणि या व्यक्तीने असा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते वाघ आणि इतर प्राण्यांचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. जे पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.
advertisement
advertisement
ही क्लिप पाहून लोकांनी त्यावर कमेंटही केल्या. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले - या सुंदर प्राण्याचे घर जंगल आहे. त्याला पाळीव प्राणी बनवू नये. आणखी एका यूजरने लिहिले - सिंहासोबत खेळण्यासाठी सिंहासारखे हृदय असावं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Nov 13, 2023 9:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
2 पायांवर उभा राहिला वाघ, व्यक्तीला वाटलं कौतुक; प्रेमाने मिठी मारली आणि पुढे घडलं असं की...










