Helicopter Crash : 2 महिन्यांत पाचवी दुर्घटना! केदारनाथमध्ये का वारंवार हेलिकॉप्टर क्रॅश होत आहेत?

Last Updated:

Kedarnath helicopter crash : हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या भाविकांचे जीव धोक्यात आहेत. सतत होणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातांच्या घटना आता भाविकांना घाबरवत आहेत.

News18
News18
डेहराडून : रविवारी डेहराडूनहून केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये कोसळलं, ज्यामध्ये एकूण सात लोक होते. हा पहिला अपघात नाही. याआधीही अनेक अपघात झाले आहेत. हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या भाविकांचे जीव धोक्यात आहेत. सतत होणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातांच्या घटना आता भाविकांना घाबरवत आहेत. वारंवार होणाऱ्या हेलिकॉप्टर क्रशमागील कारण काय आहे?
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. लाखो भाविक यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम इथं पोहोचत आहेत. काही लोक पायी जात आहेत, तर अनेक लोक हेलिकॉप्टरने दर्शनासाठी धाम येथे पोहोचत आहेत. असंच एक हेलिकॉप्टर रुद्रप्रयागहून केदारनाथला जात होतं, ते सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळलं. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे.
advertisement
मे आणि जून या दोन महिन्यात इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या 4 घटना घडल्या आहेत.
8 मे 2025 : उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर अपघात
चारधाम यात्रेदरम्यान सकाळी 8.45 वाजता ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर 'एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर मस्तू भास्कर नावाचा एक प्रवासी जखमी अवस्थेत बचावला.
advertisement
13 मे 2025 : उखीमठमध्ये आपत्कालीन लँडिंग:
बद्रीनाथहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे उखीमठमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
7 जून 2025 : रुद्रप्रयागमधील बदासू येथे क्रॅश लँडिंग
सिरसी हेलिपॅडवरून केदारनाथला जाणारे केस्ट्रेल एव्हिएशन हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे केदारनाथ राष्ट्रीय महामार्गावरील बदासूजवळ क्रॅश लँडिंग झाले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु रस्त्यावर उभ्या असलेल्या कारचे आणि जवळच्या दुकानाचे नुकसान झाले.
advertisement
7 जून 2025 : केदारनाथ महामार्गावर आपत्कालीन लँडिंग
वर्णन: ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयातून एका रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला गेलेल्या क्रिस्टल एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे केदारनाथ महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टरचा मागील भाग तुटला, परंतु पायलट आणि पाच प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. एका कारचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातानंतर, केदारनाथ हेली सेवा सुमारे एक तासासाठी तात्पुरती बंद करण्यात आली.
advertisement
डीजीसीएची कारवाई
8 मे ते 7 जून 2025 दरम्यान झालेल्या चार हेलिकॉप्टर अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कठोर पावलं उचलली. केस्ट्रेल एव्हिएशनच्या सेवांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आणि चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर उड्डाणं 25-35% ने कमी करण्यात आली. सुरक्षा मानकांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी लोड फॅक्टर आणि हवामान, उंची यासारख्या पॅरामीटर्सचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले.
मराठी बातम्या/Viral/
Helicopter Crash : 2 महिन्यांत पाचवी दुर्घटना! केदारनाथमध्ये का वारंवार हेलिकॉप्टर क्रॅश होत आहेत?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement