advertisement

स्टंट करायला गेला आणि भलतंच करुन बसला... भरधाव कारचा धक्कादायक Video Viral

Last Updated:

खरंतर स्टंटच्या नादात हा संपूर्ण प्रकार घडला ज्यामध्ये तरुणांनी स्वत:चा जीव तर धोक्यात टाकला शिवाय दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात टाकला आहे.

धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ
धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ
मुंबई, 31 जुलै : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. इथे नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. इथे अपघाता संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
खरंतर स्टंटच्या नादात हा संपूर्ण प्रकार घडला ज्यामध्ये तरुणांनी स्वत:चा जीव तर धोक्यात टाकला शिवाय दुसऱ्यांचा जीव देखील धोक्यात टाकला आहे. काही तरुण हे सोशल मीडियासाठी, तर कधी मज्जा म्हणून स्टंट करतात आणि असे लोक तुम्हाला रस्त्यावर वेळोवेळी पाहायला मिळतील.
हे असे स्टंट कधीकधी या लोकांच्या जीवावर बेततात, तर काही वेळा यांच्या चुकीची शिक्षा इतरांना भोगावी लागते. सध्या याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहाताना तुम्ही श्वास रोखून पाहाल, इतका तो धोकादायक आहे.
advertisement
ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की फुटपाथवर काही लोकं आहे. तेव्हा रात्रीच्या अंधारात लांबून भरधाव वेगाने कार येताना दिसत आहे. या कारचा वेग पाहून लोक सैरावैरा पळू लागले आणि आपला जीव वाचवण्यासाठी एका कोपऱ्यात जमले.
पण ही भरधाव कार देखील त्या कोपऱ्यापर्यंत आली आणि तितक्यात ती कार तेथून वळली, पण असं असलं तरी या कारने टर्न मारताच तिच्या मागची बाजू जोरदार एका तरुणाला अदळली, ज्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला.
advertisement
नशीबानं त्या कारने तेथून टर्न मारला, नाहीतर तेथे असलेल्या सर्वच लोकांचं काय झालं असतं, हे काही वेगळं सांगायला नको. पण या कारने ज्या तरुणाला धडक दिली, त्याने आपला जीव गमावल्या असल्याची माहिती मिळवली आहे.
ही घटना गुरुग्राममधील असल्याचे कळत आहे. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास उद्योग विहार फेज-4 येथे घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
क्लिपमध्ये, मद्यधुंद अवस्थेत काही तरुण दुकानाबाहेर मारुती एर्टिगा, ह्युंदाई व्हेन्यू आणि ह्युंदाई क्रेटा वापरून स्टंट करताना दिसतात. अचानक, एका एसयूव्हीचे नियंत्रण सुटले आणि ती समोर येऊन धडकली. या घटनेत एकला जागीच जीव गमवावा लागला, तर इतर दोघे जखमी झाले आहेत.
या घटनेत आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
स्टंट करायला गेला आणि भलतंच करुन बसला... भरधाव कारचा धक्कादायक Video Viral
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement