Wedding Rituals : मंगळसूत्राइतकाच महत्त्वाचा आहे, फुलांचा हार; नवरा-नवरी एकमेकांना वरमाला का घालतात माहितीये?

Last Updated:

Wedding Tradition Varmala Jaimala : हिंदू विवाहात वधुवरांनी एकमेकांना फुलांचे हार घालण्याचा विधी आहे, या हारांना जयमाला किंवा वरमाला असंही म्हणतात. पण हा विधी का केला जातो? त्याचं महत्त्व यामागील कारण अनेकांना माहिती नसेल.

News18
News18
लग्न होणं म्हणजे काय तर नवरदेवाने नवरीला मंगळसूत्र घालणं, तिच्या भांगेत कुंकू भरणं आणि त्या दोघांनी एकमेरकांच्या गळ्यात फुलांचा हार घालणं. तुम्ही अनेक लग्नांमध्ये पाहिलं असेल की लग्नाच्या मुहूर्तावर लग्न लागलं, अंतरपाट बाजूला झाला की वधू-वर एकमेकांना फुलांचा हार घालतात. अगदी कोर्ट मॅरेज केलं तरी इथंही वधूवर फुलांचा हार घालताना दिसतील. त्यामुळे मंगळसूत्रानंतर वरमाला महत्त्वाची आहे, असं म्हणायला हरकत नाही. या वरमालेचं नेमकं महत्त्व काय, वधू-वर एकमेकांना का घालतात? माहिती आहे का?
हिंदू विवाहात वधुवरांनी एकमेकांना फुलांचे हार घालण्याचा विधी आहे, या हारांना जयमाला किंवा वरमाला असंही म्हणतात. हिंदू विवाह समारंभात पाळली जाणारी ही सर्वांत जुन्या परंपरेपैकी एक आहे. हा विधी रामायण आणि महाभारत काळापासून चालत आला आहे.
वरमालेची परंपरा कधी, कशी सुरू झाली?
पौराणिक कथांनुसार फुलांचे हार घालण्याच्या विधीचा इतिहास भगवान शंकर-पार्वती, श्रीराम-सीता आणि भगवान विष्णू-देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे.
advertisement
एका आख्यायिकेनुसार स्वयंवरादरम्यान भगवान रामाने भगवान शिवाचं धनुष्य तोडलं, त्यानंतर माता सीतेने रामाच्या गळ्यात फुलांचा हार घातला आणि त्यांना आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, जेव्हा विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णू विश्वाचं व्यवस्थापन करण्यात व्यस्त होते, तेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी समुद्राच्या खोलवर अदृश्य झाली. भगवान विष्णूने तिला परत मिळवण्यासाठी समुद्रमंथन सुरू केलं. समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी तिच्या हातात फुलांचा हार घेऊन प्रकट झाली. तिने भगवान विष्णूच्या गळ्यात ही माळ घातली.
advertisement
वधूला वराला आधी वरमाला का घालते, वर वधूला का नाही?
ही परंपरा सुरू झाली, तेव्हा पुरुषांना स्त्रीशी लग्न करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागायचं, त्यामुळे मुलींचं स्वयंवर व्हायचं. ज्यामध्ये मुलगी तिच्या आवडीच्या पुरुषाला वरमला घालून लग्नासाठी निवडायची. म्हणूनच आताही वधू वराच्या गळ्यात आधी वरमाला घालतात.
या विधीचा अर्थ काय, का केला जातो?
हा विधी पूर्ण करून, वधू आणि वर सात जन्मांसाठी लग्नबंधनात अडकण्यासाठी पहिलं पाऊल टाकतात. दोघंही एकमेकांना पुष्पहार घालतात, याचा अर्थ दोघंही एकमेकांना आयुष्यभर पती-पत्नी म्हणून स्वीकारतात.
advertisement
काळानुसार बदलला विधी
एकेकाळी वधू लाजत वराला हार घालायची आणि बाकीचे लोक शांतपणे उभे राहून पाहत असत. पण आता या विधीवेळी खूप मस्ती केली जाते. या विधीदरम्यान मुलीकडचे व मुलाकडचे अशा दोन टीम बनतात आणि मजामस्ती करतात. कधीकधी वराला त्याचे मित्र खांद्यावर उचलून घेतात, तर काही वेळा वधू-वर एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसतात.
advertisement
कोणत्या फुलांपासून बनवतात वरमाला?
प्रथेप्रमाणे विविधरंगी फुलांचा समावेश वरमालेत केला जातो. पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी इत्यादी रंगाची फुलं यात जास्त दिसतात. हार तयार करण्यासाठी गुलाब, कार्नेशन, ऑर्किड, झेंडू या फुलांचा वापर केला जातो. कारण ही फुलं सौंदर्य, आनंद, उत्साह यांचं प्रतीक मानली जातात. एकत्र बांधलेली सर्व फुलं वैवाहिक बंधनामुळे दोन व्यक्तींची मीलन दर्शवतात. हल्ली वरमालेत रुपये किंवा डॉलरही वापरतात, ते कपलसाठी गुड लक चार्म मानलं जातं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Wedding Rituals : मंगळसूत्राइतकाच महत्त्वाचा आहे, फुलांचा हार; नवरा-नवरी एकमेकांना वरमाला का घालतात माहितीये?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement