Wedding Ritual Rukhwat : लग्नात आवडीने मांडतात रुखवत, प्रत्येक लग्नात असतो; पण का? अनेकांना माहिती नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Tradition Rukhwat : घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते. लग्नानंतर हे रुखवत नवरी मुलगी सासरी घेऊन जाते.
लग्नाच्या मंडपात तुम्ही पाहिलं असेल की एका बाजूला रुखवत मांडलेलं असतं. ज्यात गृह सजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू , काही खाद्य पदार्थ सजवून ठेवलेले असतात. लग्न झालं वधू निरोप घेणार त्यावेळी हा रुखवत नवरदेवाला दाखवला जातो आणि तो त्या बदल्यात करवल्या किंवा मेहुण्यांना आहेर देतो. सामान्यपणे रुखवत म्हणजे अनेकांना फक्त डेकोरेशनचं सामान आणि खाद्यपदार्थ इतकंच वाटतं. पण रुखवताचं खूप मोठं महत्त्व आहे.
घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते. लग्नानंतर हे रुखवत नवरी मुलगी सासरी घेऊन जाते.
रुखवतात दिल्या जाणाऱ्या वस्तू
बैलगाडी, डोली, सप्तपदी, सौभाग्य अलंकार, आईचा निरोप लिहिलेली कार्डशीटस्, तुळशी वृंदावन, सजवाट केलेले कलश, सजवलेली पान-सुपारी, कृष्णाची हंडी, ताटावरील रुमाल, तोरण, विणलेला आरसा, विणलेल्या बाहुल्या, विणलेला गणपती, सजवलेले घर, आईस्क्रीम काड्यांची होडी, रंगीत शेवया, झुंबर, लटकन, डिझायनर तोरण, सनई-चौघडा, नवरा-नवरी,सुपारीचे भटजी, विहिण पंगत, गौरीहार, जातं, पाटा-वरवंटा, उखळ, भातुकली, फुलदाणी, फळे या गोष्टी साधारण कोणत्याही रुखवतामध्ये असतात.
advertisement
रुखवत म्हणजे काय?
रुखवत हा शब्द रुखसत आणि वतन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. रूखसत म्हणजे विदाई, निरोप घेणं, दूर जाणं आणि वतन म्हणजे आपला देश किंवा प्रदेश. लग्न झाल्यावर मुलगी आपला प्रदेश सोडून जाते. रुखसतच्या वेळी मुलीला आपल्या वतनातील काही खास गोष्टी तिच्या सोबत दिल्या जात. त्या खास वस्तूंना रुखवत असं म्हणतात.
advertisement
रुखवत का दिलं जातं?
पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुलगी लग्न होऊन सासरी गेली की माहेरच्या लोकांशी मुलीचा संपर्क क्वचितच व्हायचा. आपली आठवण मुलीला राहावी या उद्देशानं मुलीच्या मावश्या, आत्या, काकी, बहिणी आणि मैत्रिणी एकत्र बसून काही विशेष वस्तू आपल्या हाताने बनवून देत असत.
advertisement
या वस्तूंशी मुलीचं भावनिक नातं जोडलेलं असायचं. बारा महिने खराब न होणारे खाद्यपदार्थ सुद्धा रुखवतात बनवून दिले जातात. कुरडया, पापड्या, सांडगे, शेवया तसंच त्या प्रदेशातील काही खास वस्तूंचा रुखवतामध्ये समावेश असतो.
सध्याच्या काळात मुलगी कितीही दूर असली तरी सुद्धा तंत्रज्ञानामुळे ती सर्वांशी जोडलेलीच राहते. त्यामुळे रुखवताची प्रथा कमी झाली असली तरी नाहीशी झालेली नाही. वेळेच्या अभावामुळे आता तयार वस्तूंवर भर दिला जातो. तिला अनेक वर्ष टिकतील अश्या गृहोपयोगी वस्तू , इलेक्ट्रॅानिक साधने दिली जातात.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 12, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Wedding Ritual Rukhwat : लग्नात आवडीने मांडतात रुखवत, प्रत्येक लग्नात असतो; पण का? अनेकांना माहिती नाही


