advertisement

Earth Video: पृथ्वी जवळून कशी दिसते? एस्ट्रोनॉटने शेअर केला नेत्रदीपक VIDEO

Last Updated:

आकाश, पृथ्वी, अंतराळ, अशा सर्वच गोष्टींविषयी लोकांना नेहमी आकर्षण असतं. जवळून ते कसं दिसत असेल आणि तेथील हलचाली कशा होत असतील, तेथील दृश्य कसे असतील? असे अनेक प्रश्न सतत पडत असतात.

 पृथ्वी जवळून कशी दिसते? एस्ट्रोनॉटने शेअर केला नेत्रदीपक VIDEO
पृथ्वी जवळून कशी दिसते? एस्ट्रोनॉटने शेअर केला नेत्रदीपक VIDEO
नवी दिल्ली : आकाश, पृथ्वी, अंतराळ, अशा सर्वच गोष्टींविषयी लोकांना नेहमी आकर्षण असतं. जवळून ते कसं दिसत असेल आणि तेथील हलचाली कशा होत असतील, तेथील दृश्य कसे असतील? असे अनेक प्रश्न सतत पडत असतात. याविषयी संशोधन सुरु असतं आणि शास्त्रज्ञ नवनवीन माहिती शेअर करत असतात. याचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. अशातच पृथ्वीचा एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये पृथ्वीचे जवळून दृश्य पहायला मिळत आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या एका एस्ट्रॉनटने पृथ्वीचा जवळून व्हिडीओ शेअर केलाय. स्पेस सेंटरमधून पृथ्वी कशी दिसते याचं एक मनमोहक दृश्य समोर आलं असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगानं व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये पृथ्वीचा वरचा भाग अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. पृथ्वी ढगांनी वेढलेली दिसत आहे. अंतराळ स्थानकाच्या आतून हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोक याला एक अद्भुत दृश्य म्हणतायेत. @wonderofscience नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचं हे दृश्य डोळ्यांसाठी एका मेजवाणीपेक्षा कमी नाही. स्पेस स्टेशनमधून एका एस्ट्रॉनटनं हा नजारा कॅमेऱ्यात कैद केला आहे.
advertisement
दरम्यान, लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. याशिवाय व्हिडीओ अनेकवेळा शेअर केला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Earth Video: पृथ्वी जवळून कशी दिसते? एस्ट्रोनॉटने शेअर केला नेत्रदीपक VIDEO
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement