lane Driving म्हणजे नक्की काय? रस्ते अपघात रोखण्यासाठी याचे नियम जाणून घेणं महत्वाचं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रस्त्यावरुन गाडी चालवतानाचा एक नियम हा लेनशी संबंधीत आहे. तुम्ही लेन ड्रायव्हिंगबद्दल ऐकलं असेल. पण हे किती महत्वाचं आहे आणि याचे नियम काय आहेत माहिती का?
मुंबई : रस्त्याने गाडी चालवताना तुम्ही पाहिलं असेल की कुठे दोन पदरी रस्ता असतो तर कुठे चार. हे रस्ते स्टेट हायवे किंवा एक्सप्रेस हायवे म्हणून ओळखले जातात. पण या अशा रस्त्यांवर ड्रायविंग करताना काही नियम माहिती असणे गरजेचे आहे. ते जर तुम्हाला माहिती नसतील, तर तुम्हाला त्याचा दंड ही भरावा लागेल.
रस्त्यावरुन गाडी चालवतानाचा एक नियम हा लेनशी संबंधीत आहे. तुम्ही लेन ड्रायव्हिंगबद्दल ऐकलं असेल. पण हे किती महत्वाचं आहे आणि याचे नियम काय आहेत माहिती का?
वास्तविक तुम्ही असे म्हणू शकता की, लेन ड्रायव्हिंग ही रस्त्यांवरील सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धती संबंधित गोष्ट आहे.
लेन ड्रायव्हिंगचे स्वतःचे नियम आहेत, जरी ते कायदेशीर केले गेले नाही. मात्र, रस्त्यांवरून चालताना जर तुम्ही लेन तोडली तर यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. विशेष करुन एक्सप्रेसवेवर असे अपघात होतात. ज्यामुळे वाहतूक पोलिस तुमच्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नक्कीच दाखल करू शकतात.
advertisement
लेन म्हणजे रस्त्याचा काही भाग. सामान्यतः भारतीय महामार्ग दोन लेनपासून 04 ते 06 लेनपर्यंतचा असतो. तथापि, देशातील काही द्रुतगती महामार्ग 08 लेनचे आहेत. ह्यूस्टन, अमेरिकेतील एका महामार्गाला 26 लेन आहेत आणि तो जगातील सर्वाधिक लेन असलेला रस्ता असल्याचे म्हटले जाते.
भारतात लेन ड्रायव्हिंग करताना कोणते नियम पाळले पाहिजेत?
भारतात, डावी लेन ही संथ गतीने चालणारे वाहने आणि अवजड वाहनांसाठी आहे. मधली लेन मध्यम गतीच्या वाहनांसाठी आहे. तर उजवी लेन वेगवान वाहने आणि ओव्हरटेकिंगसाठी आहे. आता यामध्ये कधीही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना त्याला उजव्या बाजूनेच ओव्हर टेक करावे.
advertisement
मग आता प्रश्न असा की चुकीच्या लेन बदलण्यामुळे अपघात कसे होतात?
06 लेनच्या रस्त्यांवरील बहुतेक घटना चुकीच्या लेन बदलामुळे किंवा चुकीच्या लेनमध्ये चालणाऱ्या सुस्त कारमुळे होतात. तसेच, लेनमध्ये अचानक डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जाऊ नये. भारतासारख्या देशात हॉर्न वाजवून गाडी ओव्हरटेक करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण असं करणं देखील कधीकधी धोक्याचं ठरु शकतं.
advertisement
20 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात जेव्हा ऑटोमोबाईल्स, ट्रक आणि बसेसचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला तेव्हा समोरासमोर टक्कर होणे सामान्य झाले.
1906 मध्ये, रस्ते अधिक सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात मिशिगनच्या वेन काउंटीमध्ये पहिले रोड कमिशन स्थापन करण्यात आले. हेन्री फोर्ड या मंडळावर होते. तोपर्यंत काँक्रीटचे रस्ते नव्हते. 1909 मध्ये आयोगाने पहिला काँक्रीट रस्ता तयार करण्याचे आदेश दिले.
advertisement
महामार्गासाठी लेन रस्त्यांची कल्पना 1911 मध्ये झाली. त्यामुळेच रस्ते आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष एडवर्ड एन. हायन्सला लेन रस्ते आणि त्याच्या चिन्हांचा शोधक मानले जाते. 1917 च्या सुमारास रस्त्यांवर पांढऱ्या रंगाने लेनचे विभाजन आणि चिन्हांकित करण्याचे काम सुरू झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2024 8:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
lane Driving म्हणजे नक्की काय? रस्ते अपघात रोखण्यासाठी याचे नियम जाणून घेणं महत्वाचं









