'गयी' किंवा 'गई' कोणता शब्द बरोबर? हिंदीमधील हा शब्द 90 टक्के लोक वापरतात चुकीचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही लोक तर आयुष्यभर अनेक शब्द चुकीचे बोलतात किंवा लिहिलात.
मुंबई, 08 नोव्हेंबर : कोणाशीही बोलताना किंवा संभाषण करताना महत्वाचे असतात ते शब्द. लोक वेगवेगळ्या भाषेत बोलतात. पण कधी कधी बोलताना लोक दोन भाषांना एकत्र करुन बोलतात. तर कधी असे शब्द बोलून जातात की ते शब्द बरोबर आहेत की नाहीत. तसेच तो शब्द अस्तित्वात देखील आहे का? याचा विचार करत नाहीत.
काही लोक तर आयुष्यभर अनेक शब्द चुकीचे बोलतात किंवा लिहिलात. असा एक शब्द लिहिण्याचा संभ्रम काही लोकांमध्ये आयुष्यभर राहतो तो म्हणजे 'गयी' आणि 'गई'. हा तसा हिंदी शब्द आहे. पण बऱ्याचदा घराबाहेर लोकांशी बोलताना आपल्या हिंदीमध्ये बोलावं लागतं अशावेळी या दोघांमधील कोणता शब्द बरोबर हे अनेकांना माहिती नाही.
अलीकडेच, Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्याने 'गयी' आणि 'गई' या हिंदी शब्दांमध्ये काय फरक आहे, असे विचारले, काही लोक 'गयी' तर काही 'गई' असे लिहितात. याला उत्तर देताना यूजर्सनी त्यांची वेगवेगळी मते मांडली आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे युक्तिवाद होते.
advertisement
'गयी' आणि 'गई'मध्ये खरंच फरक आहे का?
मुद्दा असा आहे की 'गयी' आणि 'गई'मध्ये काही फरक आहे की नाही? दोन्ही एकाच कृतीसाठी वापरले असले तरी ऐकल्यावर फरक कळत नाही, पण लिहिताना गोंधळ निर्माण होतो. याबद्दल, एका वापरकर्त्याने हिंदीच्या प्रमाणीकरणाखाली श्रुतिमुलक आणि स्वरात्मक रूपे सांगितली आहेत.
ज्या शब्दांमध्ये स्वरात्मक रुप आणि श्रुतिमूळ दोन्ही वापरले जातात, तेव्हा फक्त स्वरात्मक रूप विचारात घेतले जाते, अशा वेळी गयी ऐवजी गई हा शब्द बरोबर असेल. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने असा युक्तिवाद केला की गयी हे क्रियाविशेषण आहे, जे क्रियापदानंतर माहिती म्हणून वापरले जाते, तर गई एक क्रियाविशेषण आहे, जे स्त्रीलिंगी लिंगाबद्दल माहिती देते.
advertisement
एवढ्या वादानंतर जे समोर आले ते म्हणजे हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत आणि लोक ते स्वतःच्या समजुतीनुसार लिहितात. त्यांचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत बदलत नसल्यामुळे, ते दोन्ही प्रकारे लिहिलेले जाते आणि हे दोन्ही वैध आहे. या क्रियापदांमध्ये 'yi' आणि 'ee' बद्दल संभ्रम आहे, परंतु बरोबर किंवा चुकीचे म्हणता येत नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 08, 2023 3:19 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'गयी' किंवा 'गई' कोणता शब्द बरोबर? हिंदीमधील हा शब्द 90 टक्के लोक वापरतात चुकीचा










