या देशात ट्रॅफिक सिग्नलवर लाल, पिवळा आणि हिरवा नव्हे तर 'निळा' रंग वापरला जातो, पण का?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जपानी भाषेत हिरव्यासाठी "मिदोरी" हा शब्द असला तरी पारंपरिकतः हिरव्या रंगाला "आओ" म्हटले जाते. वाहतूक सिग्नलसाठी जपानने हिरव्या रंगाऐवजी निळसर रंग निवडला. हा रंग हिरव्याचा शेड असल्याचे सांगितले जाते, पण तो निळ्या रंगासारखा दिसतो.
लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की, हिरवा रंग म्हणजे 'जा' आणि लाल रंग म्हणजे 'थांबा'. हिरवा, पिवळा आणि लाल रंगांवर अनेक कविताही लिहिल्या गेल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात एक असा देश आहे जिथे या सगळ्या शिकलेल्या गोष्टी खोट्या ठरतात? कारण या देशात पिवळे आणि लाल दिवे वापरले जातात, पण हिरव्या ऐवजी निळा दिवा वाहतूक नियंत्रणासाठी वापरला जातो.
चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा देश. या देशाचे नाव आहे जपान. तंत्रज्ञान, उत्तम सुविधा आणि मजबूत अर्थव्यवस्था यासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात ट्रॅफिक लाईटमध्ये हिरवा रंग का वापरला जात नाही? खरं तर, जपानी भाषेची एक विचित्र गोष्ट आहे, ज्यामुळे हे सगळं घडलं आहे. 'ऍटलास ऑब्स्क्युरा' या वेबसाईटनुसार, जपानमध्ये अनेक शतकांपासून काळा, पांढरा, लाल आणि निळा या मुख्य 4 रंगासाठी होते.
advertisement
रंगांच्या शब्दांमुळे गोंधळ
जपानमध्ये निळ्या रंगाला 'आओ' म्हणतात. जर हिरव्या रंगाचं वर्णन करायचं असेल, तर त्यालाही 'आओ' च म्हटलं जाई. हे अनेक वर्षं चालत आलं. पण अनेक शतकं उलटल्यावर, हिरव्या रंगासाठी 'मिदोरी' हा शब्द वापरला जाऊ लागला. 'मिदोरी' हा 'आओ' चाच एक प्रकार होता. शब्द बदलला पण लोकांनी ते नाव स्वीकारलं नाही. लोक हिरव्या रंगाला 'आओ' च म्हणत राहिले.
advertisement
...यामुळे निळा दिवा वापरला जातो
आता आपण ट्रॅफिक सिग्नलच्या हिरव्या दिव्याकडे येऊ. जपान सरकारने आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करत सिग्नलसाठी हिरवा रंग वापरला. पण जपानच्या अधिकृत वाहतूक नियमांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये, हिरव्या दिव्याला 'मिदोरी' नव्हे तर 'आओ' म्हटलं गेलं. सरकार हिरवा रंग निवडत होतं, पण भाषा तज्ज्ञ आणि सामान्य लोक याचा विरोध करत होते.
advertisement
ते म्हणाले की, "जपानी नियमांनुसार जर 'आओ' रंग निवडायचा असेल, तर सरकारने तोच रंग वापरायला हवा." बाह्य आणि अंतर्गत दबावामुळे प्रशासनाने तिसरा मार्ग निवडला. 1973 मध्ये, त्यांनी 'फिरोजी' (Turquoise) रंगाचा दिवा निवडला. त्यांनी दावा केला की, त्यांचा हिरवा रंग निळ्या रंगाची एक छटा आहे. म्हणजेच, एक रंग जो हिरवा आहे पण निळा दिसतो. जपानला जाणारे लोक मानतात की, देशात निळा ट्रॅफिक लाईट आहे, पण तिथलं सरकार असा युक्तिवाद करतं की तो निळा नाही, तो हिरव्या रंगाची एक छटा आहे जी निळी दिसते.
advertisement
हे ही वाचा : किन्नरांची अंत्ययात्रा रात्रीच का काढली जाते? त्यांना मृत्यूनंतर चपलांनी का मारलं जातं? सत्य ऐकाल, तर चकीत व्हाल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/Viral/
या देशात ट्रॅफिक सिग्नलवर लाल, पिवळा आणि हिरवा नव्हे तर 'निळा' रंग वापरला जातो, पण का?