advertisement

पावसाला सुरुवात होताच का जाते अनेक ठिकाणची लाइट? ही असू शकतात कारणं

Last Updated:

हवा थोडीशी पावसाळी झाली आणि आकाशात काळे ढग जमले की लाइट्स जातात हा अनुभव भारतात आपण सर्रास घेतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : पावसाळा सुरू होताच अनेक त्रास सुरू होतात. पुरामुळे होणारं नुकसान, रोगराई, वाहतूक कोंडी अशा अनेक गोष्टी या दिवसांत खूपच वाढतात. पावसात होणारी अशीच एक नेहमीची गैरसोय म्हणजे लाइट आणि फोन अशा सेवा कोलमडणं. अनेक भागांत तर आकाशात काळे ढग भरून आले रे आले, की लगेच लाइट्स जातात. असं का होतं ते जाणून घेऊ या.
हवा थोडीशी पावसाळी झाली आणि आकाशात काळे ढग जमले की लाइट्स जातात हा अनुभव भारतात आपण सर्रास घेतो. तुम्ही खेडेगावात राहा की शहरात, हा अनुभव तुम्ही नक्की घेतला असेल. पाऊस सुरू झाला की लाइट जाणार म्हणून अनेक जण सतर्क होतात. बॅटरी, इन्व्हर्टर, मेणबत्त्या अशी तयारी करतात. कारण कधीही आणि कितीही वेळ लाइट्स जाऊ शकतात हे सगळ्यांना माहिती असतं.
advertisement
अनेकांना असं वाटतं, की पाऊस पडायला लागताच वीज विभाग कारणाशिवायच वीजपुरवठा बंद करतो किंवा विजेच्या तारा एवढ्या नाजूक असतात की पाऊस सुरू होताच त्या तुटतात आणि लाइट्स जातात; मात्र तसं नाही. पाऊस सुरू होताच लाइट्स का जातात, याचं एक खास कारण आहे. विजेच्या तारांवर ओव्हर व्होल्टेज झाल्यास लाइट्स जातात. हे ओव्हर व्होल्टेज होण्याचं कारण बहुतेक वेळा पाण्याचा थेट प्रहार हे असू शकतं. पावसाचं पाणी वेगाने येऊन विजेच्या तारांवर आपटल्यामुळे विद्युत ब्रेकर ट्रिप होतो. त्यामुळे लाइट्स जातात किंवा लाइट डिम होतात. त्याला आपण व्होल्टेज कमी झालं असं म्हणतो.
advertisement
वीज विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही दोष असतील तर त्यामुळेही पावसाळ्यात लाइट्स जाऊ शकतात. या दिवसात सहसा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. काही ठिकाणी तारा उघड्या असतील तर पावसाचं पाणी जोरात येऊन त्यांच्यावर आदळताच अपघातांची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी हवेत अनेकदा लाइट्स जातात. पावसाबरोबर आकाशात विजा चमकत असतील किंवा ढग गडगडत असतील, तर घरातल्या इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्यामुळे लाइट्स गेलेली नसेल तरी अशा वातावरणात त्यांचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पावसाला सुरुवात होताच का जाते अनेक ठिकाणची लाइट? ही असू शकतात कारणं
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement