'गुरुवार को पावभाजी खाकर आना, सिनेमाचं तिकीट' सोशल मीडियावरील का होतंय व्हायरल? हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गुरुवारी तर दसरा आहे मग हा पावभाजीवाला ट्रेंड काय? दसऱ्याच्या धामधुमीत लोक अचानक पावभाजी आणि सिनेमाचं तिकीट का आठवू लागले? असा विचार तुम्ही पण करत असाल.
मुंबई : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक ट्रेंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये लोक एकमेकांना "पावभाजी लेकर आना… सिनेमाचं तिकीट… सत्संगला जाऊया!" अशा पोस्ट्स, मेम्स शेअर करत आहेत. पण हा ट्रेंड काय आहे? तो सोशल मीडियावर का व्हायरल होतंय? गुरुवारी असं काय आहे असा प्रश्न तु्म्हाला पण पडलाय का? फेसबुकपासून ते इंस्टाग्राम, ट्विटरवर सगळीकडे हा ट्रेंड गाजतोय. पण प्रश्न असा उभा राहतो हे अचानक का?
गुरुवारी तर दसरा आहे मग हा पावभाजीवाला ट्रेंड काय? दसऱ्याच्या धामधुमीत लोक अचानक पावभाजी आणि सिनेमाचं तिकीट का आठवू लागले? असा विचार तुम्ही पण करत असाल.
खरंतर याचा संबंध आहे बॉलिवूडच्या बहुचर्चीत चित्रपटाशी. होय, आपण बोलतोय "दृश्यम" सिनेमाबद्दल. विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एक "परफेक्ट स्टोरी" तयार करतो आणि 2 ऑक्टोबरच्या दिवशी त्यांनी काय केलं याचा तपशीलवार प्लॅन सांगतो सकाळी पावभाजी खाल्ली, मग सिनेमा पाहिला आणि नंतर सत्संगला हजेरी लावली. सिनेमातील हा सीन इतका प्रभावी ठरला की प्रेक्षकांच्या लक्षात तो चांगलाच राहिला आहे, त्यामुळे दर 2 ऑक्टोबरला लोक या सीनची आठवण काढतात.
advertisement
तेव्हापासून दरवर्षी 2 ऑक्टोबरला इंटरनेटवर हा सीन पुन्हा जिवंत होतो. यावर्षी दसऱ्यासोबत 2 ऑक्टोबर, गांधीजयंती आल्यामुळे अनेकांना या ट्रेंडचा विसर पडला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर हा ट्रेंड पाहून काही लोक गोंधळले आहेत.
यंदा दसऱ्याच्या गजबजाटातही हा ट्रेंड पुन्हा व्हायरल होतोय आणि सोशल मीडियावर हास्याचे फवारे उडवत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'गुरुवार को पावभाजी खाकर आना, सिनेमाचं तिकीट' सोशल मीडियावरील का होतंय व्हायरल? हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?