साप मुंगसाला का घाबरतो? भांडणात वापरतो खास ‘फाइटिंग स्टाईल’, उड्या, वेग आणि युक्तीचा जबरदस्त खेळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यामागचं खरं कारण काय आहे? साप मुंगसाला एवढा का घाबरतो? आणि किंग कोबरा सारखा विषारी सापसुद्धा मुंगुसासमोर हरतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
मुंबई : साप आणि मुंगुस यांच्यातील भांडण कोणाला माहित नाही? ते दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत. जिथे मोठे-मोठे प्राणी सापाला त्याच्या विषाला घाबरतात, तिथे मुंगुस मात्र सापाला आणि त्याच्या विषाला सामोरं जातं. त्यामुळे मुगुंस समोर दिसला तर साप तिथे न थांबता तिथून पळ काढतो. पण, यामागचं खरं कारण काय आहे? साप मुंगसाला एवढा का घाबरतो? आणि किंग कोबरा सारखा विषारी सापसुद्धा मुंगुसासमोर हरतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
नेवळा हा अतिशय चपळ, बुद्धिमान आणि वेगवान प्राणी आहे. सापांशी लढताना तो निंजा प्रमाणे वागत असतो. झपाट्याने उडी मारून तो सापाच्या हल्ल्याला चुकवतो आणि योग्य क्षणी त्याच्या डोक्यावर झडप घालतो. अनेक वेळा नेवळा सरळ सापाचं डोकं फाडून त्याचा खेळ संपवतो.
किंग कोबरा विरुद्ध मुंगुस कोण भारी?
किंग कोबरा हा जगातील एक अत्यंत विषारी साप मानला जातो, पण त्याच्या विषाचा मुंगुसावर फारसा परिणाम होत नाही. यामागचं कारण म्हणजे मुंगसाच्या शरीरातील विशेष जैविक संरचना, जी त्याला विषप्रभावापासून वाचवते. मात्र, असंही नाही की नेवळा नेहमी वाचतोच काही वेळा कोबऱ्याचा विषप्रभाव त्याच्यावर होत असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
साप आणि नेवळा यांचं नातं हे निसर्गातील एक प्राचीन आणि साहसी संघर्षाचं उदाहरण आहे. नेवळ्याच्या वेगवान हालचाली, रणनीती आणि विष-प्रतिरोधक क्षमता यामुळे तो बहुतेक वेळा विजयी ठरतो. यामुळेच साप त्याला टाळू लागतात.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/Viral/
साप मुंगसाला का घाबरतो? भांडणात वापरतो खास ‘फाइटिंग स्टाईल’, उड्या, वेग आणि युक्तीचा जबरदस्त खेळ