बॅग उघडताच थक्क झाली गर्भवती महिला; समोर आलं पार्टनरचं असं गुपित की अंगावर आला काटा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कपडे ठेवताना तिची नजर त्याच्या बॅगेवर पडली. काहीतरी मनात आलं आणि तिने ती बॅग उघडली. पण आत जे दिसलं, त्याने तिचा विश्वासच तुटला.
मुंबई : कधी कधी आयुष्यात घडणाऱ्या अगदी साध्या गोष्टी सुद्धा आयुष्यभर लक्षात राहतात. एक क्षण असा येतो, जो सगळं काही बदलून टाकतो. असाच एक क्षण एका महिलेच्या आयुष्यात आला. जेव्हा ती घराची साफसफाई करत होती आणि अचानक तिच्या नजरेसमोर असं काही आलं की तिच्या अंगावर काटा आला. काही सेकंदात तिचं मन धस्स झालं आणि विश्वासच ढासळला.
खरं तर ही गोष्ट एका 22 वर्षांच्या तरुणीची आहे, जी आठ महिन्यांची गर्भवती होती. तिचं आणि तिच्या 24 वर्षांच्या पार्टनरचं रिलेशन मागील चार वर्षांपासून सुरू होतं. दोघांचं लग्न झालेलं नव्हतं, पण ते एकत्र राहत होते आणि लवकरच त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. सगळं काही छान सुरू असल्यासारखं वाटत होतं पण एका रात्रीत सगळं बदललं.
advertisement
त्या दिवशी तिचा पार्टनर भेटायला आला होता. संध्याकाळी तो मित्रांसोबत बाहेर पार्टीला गेला आणि ती घरी साफसफाई करत होती. कपडे ठेवताना तिची नजर त्याच्या बॅगेवर पडली. काहीतरी मनात आलं आणि तिने ती बॅग उघडली. पण आत जे दिसलं, त्याने तिचा विश्वासच तुटला, बॅगेत कंडोमचा एक पॅकेट होतं.
महिलेच्या मनात लगेच प्रश्न उभे राहिले. ती आठ महिन्यांपासून गर्भवती होती आणि या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध नव्हते, मग हे पॅकेट आलं कुठून? गोंधळ, राग आणि धक्का सगळं एकाचवेळी जाणवलं. तिने लगेच त्या पॅकेटचा फोटो काढून पार्टनरला पाठवला आणि विचारलं, “हे काय आहे?”
advertisement
त्यावर तो म्हणाला, “हे ऑफिसमधून चुकून बॅगेत आलं.” पण तिला हे उत्तर पटलं नाही, कारण पॅकेट पूर्ण नवीन होतं. ती शांत बसू शकली नाही. तिने ही गोष्ट Reddit या सोशल मीडिया फोरमवर शेअर केली आणि लोकांकडून सल्ला मागितला “मी काय करावं?” नेटिझन्सनी मात्र स्पष्ट मत मांडलं जर तुम्ही दोघांनी कधी कंडोम वापरलेच नाहीत आणि तरी ते त्याच्या बॅगेत सापडलं, तर तो नक्कीच काहीतरी लपवत आहे.
advertisement
ही केवळ एका नात्यातील फसवणुकीची गोष्ट नाही, तर प्रत्येकासाठी एक शिकवण आहे की नातं टिकवायचं असेल तर विश्वास आणि प्रामाणिकपणा ही दोनच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. कारण एकदा विश्वास तुटला की नातं टिकणं अशक्यच होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 08, 2025 10:33 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बॅग उघडताच थक्क झाली गर्भवती महिला; समोर आलं पार्टनरचं असं गुपित की अंगावर आला काटा








