VIDEO : 'मुंबई लोकल म्हणजे दुसरं घर?' कपडे वाळवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Last Updated:

मुंबईकरांच्या बुद्धीमत्तेला आणि कोणत्याही गोष्टीला सामोर जाण्याच्या स्पीरिटला मात्र खरंच सलाम करावा लागेल.

viral video
viral video
मुंबई : मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने खूपच कहर केला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तो अगदी नॉन स्टॉप पडत आहे. ज्यामुळे बहुतांश लोक हैरान देखील झाले आहेत. खासकरुन बैठ्या चाळीत रहाणाऱ्या लोकांना तर पावसामुळे असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. घरी पाणी भरण्याची समस्या तर आहेच शिवाय घर लहान असल्यामुळे आणि पावसामुळे कपडे न सुकण्याच्या समस्येला देखील अनेकांना सामोर जावं लागतं.
पण मुंबईकरांच्या बुद्धीमत्तेला आणि कोणत्याही गोष्टीला सामोर जाण्याच्या स्पीरिटला मात्र खरंच सलाम करावा लागेल. कारण ते आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीमुळे हार मानत नाहीत. उलट ते आयुष्यातील बऱ्याच गोष्टींसाठी जुगाड शोधत असतात. असाच जुगाड एका महिलेनं केला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
या व्हिडीओमधील महिला चक्क रेल्वेमध्ये आपले कपडे सुकवताना दिसत आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत. ही महिला रेल्वेच्या दरवाज्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आपला गाऊन (मॅक्सी) सुकवत होती. व्हिडीओत हा गाऊन ओला असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि ही महिला मागचा पुढचा कसलाच विचार न करता अगदी आरामात कपडे सुकवताना दिसत आहे.
advertisement
advertisement
यातील विनोद म्हणजे, कोणाला याचा कसलाच त्रास झाला नाही, सगळे इतके सहज दिसत आहेत की हे दृश्य आत बसलेल्या लोकांना रोजचंच वाटत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.
तसं पाहाता ट्रेनमध्ये कपडे सुकत घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत होता, ज्यामध्ये ट्रेनच्या दरवाजाजवळ काही टॉवेल सुकत घातल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
advertisement
advertisement
हे सगळे दृश्य पाहाता मुंबईकरांचा जुगाड़ हा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. पाऊस, गर्दी, जागेची कमतरता यावर त्वरित उपाय शोधण्यात त्यांची निपुणता हेच त्यांचं खरं सौंदर्य आहे. एका युजरने म्हटलं, “लोकल म्हणजे मुंबईकरांचं दुसरं घर आहे.” आणि हे बरोबर देखील आहे. तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळे सण रेल्वेमध्ये साजरा करता पाहिलंच असेल.
advertisement
शेवटी, मुंबईकरांचा हा प्रवास, संसाधनांचा वापर आणि तात्काळ उपाय शोधण्याची वृत्ती, ही ्यांची खरी ओळख आहे आणि हा व्हिडिओ याचे सुंदर उदाहरण ठरतो.
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : 'मुंबई लोकल म्हणजे दुसरं घर?' कपडे वाळवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement