प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो पाहिले आणि महिलेने गमावले 3 कोटी रुपये, प्रकरण काय?

Last Updated:

Woman lost money after see actor photo : एक महिला जिला एक प्रसिद्ध अभिनेता खूप आवडत होता. महिलेचं अभिनेत्यावरील हेच प्रेम तिला महागात पडलं. महिलेने त्या अभिनेत्याचे फोटो पाहिले आणि तब्बल 3 कोटी रुपये कमावले आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
प्रत्येकाला कोणता ना कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आवडतात. काही लोक तर त्यांचे पोस्टर आपल्या रूमममध्ये लावतात, मोबाईलचा वॉलपेपर किंवा सोशल मीडियावर डीपी किंवा प्रोफाईल फोटो म्हणूनही ठेवतात. अशीच एक महिला जिला एक प्रसिद्ध अभिनेता खूप आवडत होता. महिलेचं अभिनेत्यावरील हेच प्रेम तिला महागात पडलं. महिलेने त्या अभिनेत्याचे फोटो पाहिले आणि तब्बल 3 कोटी रुपये कमावले आहे.
दक्षिण कोरियातील ही महिला. जिला स्क्विड गेमचा प्रसिद्ध अभिनेता ली जंग जे खूप आवडत होता. एकदा सोशल मीडियावर तिला त्याचा मेसेज दिसला. त्याचे पर्सनल फोटोही तिने पाहिले. त्यानंतर तो अभिनेताच त्या महिलेशी थेट बोलू लागला. सोशल मीडियावरचं त्याचं चॅटिंग चॅट काकाओटॉक मेसेजिंग एपवर आलं. तो तिला हनी, स्विटी अशी हाक मारायचा. त्यामुळे महिला त्याला आणखीनच भुलली. एक दिवस तर त्याने तिला आपलं तिच्यावर प्रेम करत असल्याचं सांगितलं. त्यानंकर काही ना काही कारण सांगून त्याने तिच्याकडून पैसे मागितले.
advertisement
महिलेने पोलिसांना सांगितलं, "मी त्याला 6 लाख फक्त यासाठी पाठवले की तो एक व्हीआयपी पास घेईल आणि आम्ही दोघं समोरासमोर एकमेकांना भेटू. पण आमची भेट कधीच झाली नाही. तो मला म्हणाला की जसा तो कोरियात परत येईल तो मला माझे पैसे परत देईल. मी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला"
advertisement
तो परदेशी विमानतळावर अडकला आहे आणि त्याच्याकडे घरी परतण्याचा मार्ग नाही. तिला खरं वाटावं म्हणून तो आपलं ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसेन्सचे एआय जनरेटेड फोटो पाठवायचा. जोपर्यंत महिलेला आपली फसवणूक झाल्याचं समजलं तोपर्यंत त्याने 500 मिलियन व़न म्हणजे जवळपास 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवली होती.
advertisement
ज्याला अभिनेता समजून महिला त्याच्याशी बोलत होती, ज्याला पैसे पाठवत होती. तो खरा अभिनेता नव्हताच. तर त्याच्या नावाने फसवणूक करणारा भामटा होता. महिला सायबर क्राईमची शिकार झाली होती. पण तिला आपण अभिनेत्यासोबत लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं वाटत होतं. तिची फसवणूक करणारी ती व्यक्ती कोण हे अद्याप समजलेलं नाही.
दरम्यान खऱ्या अभिनेत्याने चाहत्यांना सावध केलं आहे. स्क्विड गेम स्टारच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला पैसे पाठवू नका, असं आवाहन अभिनेत्याने केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो पाहिले आणि महिलेने गमावले 3 कोटी रुपये, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement