गर्लफ्रेंडसाठी बनला डॉक्टर, पण नशीबाचा उलटा खेळ; तिच्या बहिणीसोबत थाटावा लागला संसार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Become Doctor For Girlfriend : एका तरुणीवर त्याचा जडला. तिला मिळवण्यासाठी, कायमचं आपलं करण्यासाठी, तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने त्याचा बिझनेस सोडला आणि डॉक्टर बनला पण...
राजीव शर्मा, प्रतिनिधी/लखनऊ : जेव्हा कुणी प्रेमात पडतं तेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. अशीच एक लव्ह स्टोरी आहे डॉ. सुमंत गुप्ता यांची. ज्यांचा एका तरुणीवर जडला. तिला मिळवण्यासाठी कायमचं आपलं करण्यासाठी तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांचा बिझनेस सोडला आणि डॉक्टर बनले. पण नशीबाने काही वेगळंच ठरवलं होतं. जिच्यासाठी ते डॉक्टर बनले तिच्या बहिणीशी त्यांना संसार थाटावा लागला.
उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील ही कहाणी. गोहना इथं राहणारे डॉ. सुमंत गुप्ता 8 एप्रिल 1990 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मुहम्मदाबाद गोहना इथं झालं. त्यांनी बलदेव दास माध्यमिक शाळेतून पदवी प्राप्त केली आणि टाउन इंटर कॉलेजमधून इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासादरम्यान त्यांचा कल व्यवसायाकडे होता. त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करायचं होतं. पण 2010 साली त्यांची भेट रचना गुप्ताशी झाली आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं.
advertisement
सुमंत आणि रचना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करायचं ठरवलं आणि आपापल्या घरी सांगितलं. रचनाचे वडील अरविंद यांनी सुमंतसमोर अट ठेवली. रचनाशी लग्न करायचं असेल तर त्याने आधी डॉक्टर व्हावं. त्यांनी सुमंतला एमबीबीएस पूर्ण करण्याची अट घातली. प्रेमाच्या वेडेपणाने सुमंतला आपला मार्ग बदलण्यास भाग पाडलं. वडिलांची परिस्थिती आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा लक्षात घेता, त्याने आपलं बिझनेसचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2012 मध्ये कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर सुमंतने एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी लखनऊच्या केजीएमयूमध्ये प्रवेश मिळवला. 6 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्याने 2018 मध्ये एमबीबीएसची पदवी मिळवली. 2019 मध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नवी दिल्लीतील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेला. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने 2022 मध्ये नवी दिल्लीतील भगवान महावीर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. 2023 पासून तो मुहम्मदाबाद गोहना येथील केसरी राज हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे, मोफत शिबिरं आयोजित करत आहे.
advertisement
डॉक्टर झाल्यानंतर त्याने 2017 मध्ये त्याची प्रेयसी रचना गुप्ताशी लग्न केलं. पण नशिबाची योजना वेगळीच होती. 2024 मध्ये डिलीव्हरीवेळी तिचं निधन झाले. तेव्हापासून तो त्याच्या पत्नीला प्रेरणास्रोत ठेवून लोकांची सेवा करत आहे. पण त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने त्याचं लग्न तिच्या बहिणीशी लावून दिलं.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
November 20, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
गर्लफ्रेंडसाठी बनला डॉक्टर, पण नशीबाचा उलटा खेळ; तिच्या बहिणीसोबत थाटावा लागला संसार


