एका बिस्कीटाने बनवलं लखपती; रातोरात पालटलं महिलेचं नशीब, चकित करणारी घटना
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नशिबाने तिला लखपती तर बनवलंच पण ती हे पैसे गमावणार असतानाही नशिबाने साथ दिली आणि ती वाचली
नवी दिल्ली : जवळपास सगळेच लोक श्रीमंत होण्याचं आणि अधिक पैसे कमावण्याचं स्वप्न पाहतात. पण काही लोक असे असतात जे एका क्षणात लखपती आणि करोडपती बनतात. असं म्हणतात, की नशीब तुमच्या बाजूने असेल तर सर्वकाही चांगलंच होतं. तुम्ही जे काही करता, ती प्रत्येक कृती योग्य ठरते. नेमकं तसंच एका महिलेसोबत घडलं. बिस्किटांवर लिहिलेल्या आकड्यांवरून तिने लॉटरीचं तिकीट घेतलं आणि 41लाख रुपये जिंकले.
व्हर्जिनियाची रहिवासी असलेली टिएरा बार्ली खूप भाग्यवान ठरली. नशिबाने तिला लखपती तर बनवलंच पण ती हे पैसे गमावणार असतानाही नशिबाने साथ दिली आणि ती वाचली. Tierra Barley ने सुपरमार्केटमधून लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. बिस्किटांवर लिहिलेले आकडे लकी नंबर मानून तिने त्याच नंबरचं तिकीट घेतलं. 8 मे रोजी सोडत काढण्यात आली तेव्हा, पाच पैकी चार क्रमांक टिएरा बार्लीच्या क्रमांकाशी जुळले. यामुळे, तिला $50,000 म्हणजेच अंदाजे 41 लाख रुपयांचा जॅकपॉट मिळाला. हे पाहून तिने आनंदाने उडी मारली.
advertisement
आनंद साजरा करत असतानाच तिच्या डोक्यात आलं, की आपलं तिकीट कुठं आहे? त्याचा शोध सुरू केला असता ते सापडलं नाही. ती निराश झाली. नंतर तिच्या लक्षात आलं की तिकीट खरेदी केल्यानंतर तिने ते दुकानातच सोडलं होतं आणि ती आपल्या मुलीसह पार्कमध्ये गेली होती. सुदैवाने, जेव्हा ती दुकानात परत गेली तेव्हा जिंकलेलं तिकीट तिला परत केलं गेलं. यानंतर तिला खरा आनंद झाला.
advertisement
व्हर्जिनिया लॉटरीने गुरुवारी सांगितलं की बार्लीचे 8 मेच्या ड्रॉमध्ये पाच भाग्यवान क्रमांकांपैकी चार जुळले. जर एखाद्याचे सर्व 6 क्रमांक जुळले तर त्याला मेगा जॅकपॉट मिळेल. मात्र, हे 292.2 दशलक्षांमध्ये एकदाच घडतं. लॉटरीमधून गोळा केलेला सर्व निधी ओल्ड डोमिनियनमधील शिक्षणासाठी जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 2:53 PM IST