कृषी हवामान : आज पाऊस पुन्हा हैदोस घालणार! पिके पाण्याखाली, 15 जिल्ह्यांना अलर्ट, काय काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : पश्चिम राजस्थानातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू झाला असून, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे.
मुंबई : पश्चिम राजस्थानातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू झाला असून, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाने आज (ता. १६) अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचे इशारे दिले आहेत. रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मॉन्सून परतीचा टप्पा
सोमवारी (ता. १५) राजस्थानमधील गंगानगर, नागौर, जोधपूर आणि बारमेर या भागांपर्यंत परतीच्या मॉन्सूनची सीमा पोहोचली होती. उद्यापर्यंत (ता. १७) राजस्थानच्या आणखी काही भागांसह गुजरात व पंजाबच्या काही भागांतूनही मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पूर्व विदर्भात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
advertisement
राज्यातील पावसाची स्थिती
गेल्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसामुळे ओलावा वाढला असून, शेतकऱ्यांसाठी हा काळ निर्णायक आहे.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर घाटमाथा.
येलो अलर्ट : मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहमदनगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती. नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.
advertisement
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या फवारण्या काळजीपूर्वक कराव्यात. पिकांमध्ये किड व बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या कडधान्यांवर कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब मिश्र फवारणी करणे फायदेशीर ठरेल.
advertisement
कापूस पिकात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसल्यास एमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनोसॅड घटक असलेली फवारणी करावी. तसेच भात पिकात पानांवरील डाग किंवा करपा रोग टाळण्यासाठी ट्रायसायक्लाझोल किंवा हेक्साकोनॅझोल यांची फवारणी करावी.
दरम्यान, पावसाळी वातावरणात फवारणी करताना हवामानाचा अंदाज तपासावा आणि पाऊस थांबल्यानंतर व कोरडे हवामान असतानाच फवारणी करावी.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 8:00 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : आज पाऊस पुन्हा हैदोस घालणार! पिके पाण्याखाली, 15 जिल्ह्यांना अलर्ट, काय काळजी घ्याल?