कृषी हवामान : पावसाचा रेड अलर्ट! पुराचा धोका, मुंबईसह मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Last Updated:

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनने आता आपली पूर्ण ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने आता आपली पूर्ण ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात पावसाचा प्रचंड जोर राहण्याचा अंदाज असून, या भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट
हवामान खात्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' लागू करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः डोंगराळ आणि नदीनाल्यांच्या काठच्या भागांमध्ये राहणाऱ्यांनी पुराचा धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
advertisement
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'ऑरेंज अलर्ट'
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे आणि आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता असून या भागांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिकच्या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास अथवा अन्य कामांचे नियोजन करावे.
advertisement
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाची शक्यता
कोकणासोबतच राज्याच्या मध्य भागातही पावसाचा जोर राहणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या भागांमध्ये विजांसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा आहे.
advertisement
विजांच्या कडकडाटासह वारे
राज्यात काही भागांत पावसाबरोबरच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी जुन्या इमारती, झाडे किंवा विजेच्या खांबांपासून दूर राहावे. वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधगिरी बाळगा, प्रशासनाशी संपर्क ठेवा
राज्यातील अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : पावसाचा रेड अलर्ट! पुराचा धोका, मुंबईसह मराठवाडा, विदर्भातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement