पावसाकडून पुन्हा शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा! या जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट, कृषी सल्ला काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होत आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून, त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२६ सप्टेंबरच्या रात्री १२.३० वाजता ही डिप्रेशन प्रणाली वायव्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात, दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ केंद्रित झाली होती. त्यानंतर ही प्रणाली अधिक तीव्र होत महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण करत आहे.
advertisement
पुढील पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून, अनेक ठिकाणी रात्रभर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत राहिला. बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मुसळधार पावसामुळे कालची रात्र जागून काढली.
advertisement
दरम्यान, राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास उशिरा होणार आहे. नेहमीप्रमाणे ५ ऑक्टोबरपासून परतीची सुरुवात व्हायची, मात्र यंदा ती १० ऑक्टोबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी आणखी लांबणार असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
पूरस्थिती आणि भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. पाणी हळूहळू ओसरत असतानाच हवामान खात्याचा नव्याने दिलेला अंदाज भीतीचं वातावरण निर्माण करतोय. लोकांना पुन्हा एकदा तुफानी पावसाचा सामना करावा लागेल का, याची काळजी आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.
सोयाबीन पिकासाठी : पिकावर पिवळेपणा (यलो मोजॅक व्हायरस) किंवा पाने गळण्याची लक्षणे दिसल्यास थायोफेनेट मिथाइल (Thiophanate Methyl 70% WP) किंवा कार्बेन्डाझीम (Carbendazim 50% WP) यापैकी एक कीटकनाशक फवारणीसाठी वापरावे.
advertisement
कापूस पिकासाठी : पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्पिनोसॅड (Spinosad 45% SC) किंवा इंडोक्साकार्ब (Indoxacarb 14.5% SC) फवारणी करणे उपयुक्त आहे. पाने व फुलांवर होणाऱ्या रोगासाठी मॅन्कोझेब (Mancozeb 75% WP) वापरल्यास फायदा होईल.
advertisement
दरम्यान, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाचा कसोटीचा काळ ठरणार आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर फवारणी आणि निचरा व्यवस्थेची काळजी घ्यावी. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे खबरदारी घेणं हेच सुरक्षिततेचं उपाय ठरेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
पावसाकडून पुन्हा शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा! या जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट, कृषी सल्ला काय?