पावसाचा जोर वाढणार, 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पिकांना काय फवारण्या कराल?

Last Updated:

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने आज (3 सप्टेंबर) कोकण व घाटमाथ्यावरील भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने आज (3 सप्टेंबर) कोकण व घाटमाथ्यावरील भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
पावसाची स्थिती व अंदाज
वायव्य बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशाच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा बिकानेर, जयपूर, दातिया, सिधी, पुरी ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. या पोषक प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात मंगळवारपासून ऊन-सावल्यांच्या खेळात अधूनमधून सरी बरसत आहेत. भंडाऱ्यात सकाळपर्यंतच्या 24 तासांत राज्यातील उच्चांकी 32 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
advertisement
आज कोणता कुठे अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती.
येलो अलर्ट : मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट : नंदूरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
राज्यातील अनेक भागांत सध्या सोयाबीन, कापूस, मका आणि भाताची पिके काढणीसाठी सज्ज झाली आहेत. अशा परिस्थितीत पावसाचा जोर वाढल्याने पिकांचे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे :
advertisement
कीड व रोग व्यवस्थापनासाठी फवारणी
सोयाबीन व कापूस : अति दमट हवामानात पाने पिवळी पडणे, पाने गळणे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. अशा वेळी कार्बेन्डाझिम (50% डब्ल्यूपी) 10 ग्रॅम + मॅन्कोझेब (75% डब्ल्यूपी) 20 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मका : पाने व कणसांवर डाग दिसल्यास झिनेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
advertisement
भात : काडी कुज, पानगळ इ. रोगासाठी कॉपपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा ट्रायसायक्लाझ 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी यापैकी एखाद्या औषधाची फवारणी करावी.
मराठी बातम्या/कृषी/
पावसाचा जोर वाढणार, 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पिकांना काय फवारण्या कराल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement