कृषी हवामान : अवकाळी गेला आता थंडीचा तडाखा, या जिल्ह्यांत येणार मोठी लाट, रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं कराल?

Last Updated:

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना त्रास दिला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान बदलले आणि विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update
मुंबई : राज्यात गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून परतीचा पाऊस आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना त्रास दिला होता. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान बदलले आणि विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र आता हवामान हळूहळू स्थिर होत असून तापमानात घट होण्यास सुरुवात होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ८ नोव्हेंबरपासून मुंबई, ठाणे, रायगड तसेच विदर्भ आणि मराठवाडा या भागांत तापमानात ४ ते ५ अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात हळूहळू थंडीची चाहूल लागेल.
पावसाचा जोर ओसरतोय, तापमान घटणार
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता अजूनही आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होईल आणि हवामान कोरडे होईल. बंगालच्या उपसागरावरील चक्राकार वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्याने पावसाचे सत्र संपुष्टात येणार आहे.
advertisement
हवामान खात्याचा अंदाज आहे की राज्यातील किमान तापमान पुढील ४८ तासांत २ ते ४ अंशांनी घसरणार आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सकाळी गारवा जाणवेल, तर दुपारी किंचित उष्णता राहील. दिवसा अंशतः ढगाळ हवामान आणि रात्री हलकी थंडी अशी स्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी हंगामाची तयारी सुरू
गेल्या काही आठवड्यांतील अवकाळी पावसाने अनेक भागात खरीप पिकांचे नुकसान केले. शेतकऱ्यांची पिके कोसळली, तर काही ठिकाणी कापणी झाल्यानंतरचे धान्य ओलाव्याने खराब झाले. पण आता हवामान स्थिर होण्यास सुरुवात झाल्याने रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.
advertisement
रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, ओवा, मेथी, कांदा आणि मटार यांचा समावेश होतो. हे पीक थंड आणि कोरड्या हवामानात चांगले वाढते. पाऊस थांबल्याने जमिनीत आवश्यक ओलावा टिकून राहील, ज्यामुळे रब्बी पेरणीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण होईल.
रब्बी पिकांच्या लागवडीचे व्यवस्थापन
हवामान स्थिर झाल्याने शेतकऱ्यांनी आता खालील उपाय करून पेरणीची तयारी करावी जसे की,
advertisement
१) जमिनीची नांगरणी व भुसभुशीतपणा राखा, अवकाळी पावसामुळे जमिनीवर घट्ट थर बसले असल्यास दोन वेळा नांगरणी करून हवा खेळती ठेवावी.
२) जमिनीत नैसर्गिक ओलावा असल्याने अतिरिक्त पाणी देऊ नये. यामुळे बीजांची उगवण चांगली होते.
३) योग्य बियाणांची निवड करा. स्थानिक हवामानाला अनुरूप आणि अल्पकालीन (शॉर्ट-ड्युरेशन) जाती निवडाव्यात. उदाहरणार्थ, हरभरा – विजय, ज्वारी – मालदंडी, गहू – लोकवन जाती.
advertisement
४) मातीतील सूक्ष्म पोषक घटक टिकवण्यासाठी गांडूळखत, कंपोस्ट आणि ट्रायकोडर्माचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच ओलसर हवेमुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो, त्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : अवकाळी गेला आता थंडीचा तडाखा, या जिल्ह्यांत येणार मोठी लाट, रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं कराल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement