6,6,6,6,6,6... पाकिस्तानी खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये ठोकले सहा सिक्स, शेवटच्या बॉलवर मॅच जिंकली, पाहा Video

Last Updated:

Hong Kong Sixes Tournament : मॅचचा टर्निंग पॉईंट आला तो पाचव्या ओव्हरमध्ये, जेव्हा अब्बास आफ्रिदीने यासीन पटेलच्या 6 बॉल्सवर सलग 6 सिक्स मारले.

Abbas Afridi hits 6 Sixes in a Row
Abbas Afridi hits 6 Sixes in a Row
Abbas Afridi hits 6 Sixes in a Row : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा अविश्वसनीय विक्रम आतापर्यंत केवळ पाच खेळाडूंनी केला आहे. हा विक्रम क्रिकेटमधील अत्यंत दुर्मिळ पराक्रमांपैकी एक मानला जातो. यामध्ये टीम इंडियाच्या युवराज सिंगचा देखील समावेश आहे. हर्षल गिब्स आणि कायरन पोलार्ड या दोन पठ्ठ्यांनी देखील असा विक्रम नावावर केला होता. तर युएईचा जसकरण मल्होत्रा आणि नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी यांनी असा पराक्रम नोंदवला होता. अशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही पण एका टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंने सहा बॉलवर सहा सिक्स मारले आहेत.

12 बॉल्समध्ये विजयासाठी 67 रन्सची गरज

हाँगकाँग सिक्सेस 2025 या टूर्नामेंटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान टीमने 3 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून 43 रन्स आणि चौथ्या ओव्हरनंतर 57/1 असा स्कोर केला होता. त्यामुळे अखेरच्या 12 बॉल्समध्ये विजयासाठी 67 रन्सची गरज होती. मॅचचा टर्निंग पॉईंट आला तो पाचव्या ओव्हरमध्ये, जेव्हा अब्बास आफ्रिदीने यासीन पटेलच्या 6 बॉल्सवर सलग 6 सिक्स मारले.
advertisement

6 बॉल्सवर सलग 6 सिक्स

हाँगकाँग सिक्सेस 2025 या टूर्नामेंटमध्ये रोमांचक मॅच पाहायला मिळत आहेत. या टूर्नामेंटमध्ये पहिल्याच मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्सचा विक्रम नोंदवला गेला आहे. पाकिस्तान आणि कुवैत यांच्यात झालेल्या मॅचमध्ये हा पराक्रम झाला आणि पाकिस्तान टीमने 4 विकेट्सने मॅच जिंकली. कुवैत टीमने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 6 ओव्हर्समध्ये 123 रन्सचे मोठे टार्गेट उभे केले होते, ज्यात मीत भवसरने केवळ 14 बॉल्समध्ये 40 रन्सची आक्रमक खेळी केली. 124 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान टीमने शेवटच्या बॉलवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला.
advertisement

पाहा Video

advertisement

शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तान विजयी

विशेष म्हणजे, सहावा बॉल अंपायरने नो-बॉल ठरवला होता, त्यामुळे जेव्हा सहावा ऑफिशियल बॉल टाकला गेला, त्यावर लेग बाईचा 1 रन मिळाला. या एका ओव्हरमध्ये तब्बल 38 रन्स आल्याने मॅचचे चित्रच पालटले. आफ्रिदीने केवळ 12 बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली आणि 55 रन्सवर तो रिटायर्ड हर्ट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तान टीमला विजयासाठी 29 रन्सची आवश्यकता होती. त्यावेळी शाहिद अजीजने बॅटिंगची धुरा सांभाळली आणि अवघ्या 5 बॉल्समध्ये 23 रन्स फटकावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6,6,6,6,6,6... पाकिस्तानी खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये ठोकले सहा सिक्स, शेवटच्या बॉलवर मॅच जिंकली, पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement