राज्यात थंडीची मोठी लाट येणार! या जिल्ह्यांत तापमान प्रचंड घटणार, शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?

Last Updated:

Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच वातावरण स्वच्छ झाल्याने पावसाळी स्थिती संपुष्टात आली आहे.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच वातावरण स्वच्छ झाल्याने पावसाळी स्थिती संपुष्टात आली आहे. त्यासोबतच किमान आणि कमाल तापमानात झपाट्याने घट होत असून राज्यात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. पण आता आकाश स्वच्छ होत असून, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट जाणवते आहे. विदर्भातही किमान तापमान झपाट्याने खाली येत आहे आणि काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे.
तापमानातील बदल
मधले दोन दिवस तापमान स्थिर राहिले असले तरी आता पुन्हा घट जाणवते आहे. मुंबईतही गारवा वाढला असून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, कुलाबा केंद्रात २३.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात २१.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.
advertisement
इतर जिल्ह्यांतील स्थिती पुढीलप्रमाणे आहे
नाशिक: १३.४ अंश सेल्सिअस
सांगली: १८ अंश सेल्सिअस
जळगाव: १० अंश सेल्सिअस
बीड: १३.५ अंश सेल्सिअस
परभणी: १४.४ अंश सेल्सिअस
डहाणू: १९.७ अंश सेल्सिअस
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राज्यात सर्वत्र तापमान घटत असून थंडीचा जोर वाढत चालला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटे व रात्री गारवा जाणवतो आहे.
advertisement
रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
हवामानातील या बदलामुळे आता रब्बी हंगाम सुरू होत आहे. थंडीमुळे पिकांच्या वाढीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे.
मातीतील आर्द्रता राखा - पावसानंतर जमिनीत ओलसरपणा कमी होत असल्याने हलकी पाणी देणे सुरू ठेवा. आर्द्रता टिकवण्यासाठी सेंद्रिय आच्छादन (मल्चिंग) वापरा.
खत व्यवस्थापन - थंडीच्या दिवसांत नायट्रोजनयुक्त खतांचा अतिरेक टाळावा. पिकांना सेंद्रिय खतांचा वापर अधिक लाभदायक ठरेल.
advertisement
कीड व रोग नियंत्रण - थंडीच्या काळात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे नियमित निरीक्षण करून रोग दिसताच तत्काळ उपाययोजना कराव्यात.
सिंचनाचे नियोजन - सकाळी लवकर सिंचन टाळा, कारण थंड पाण्यामुळे मुळांवर परिणाम होऊ शकतो. दुपारी किंवा संध्याकाळी हलके सिंचन करणे योग्य ठरेल.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
राज्यात थंडीची मोठी लाट येणार! या जिल्ह्यांत तापमान प्रचंड घटणार, शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement