नोकरी सोडली, 10 गुंठ्यात यशस्वी केला नर्सरी व्यवसाय, तरुणाची 5 लाखांची कमाई

Last Updated:

अजय चव्हाण यांनी नोकरी सोडून नर्सरी व्यवसाय यशस्वी केला आहे. यामधून त्यांना वर्षाला लाखोंची कमाई होते.

+
नर्सरी

नर्सरी व्यवसायाच्या माध्यमातून बीडच्या युवकाने केली आर्थिक प्रगती

प्रशांत पवार, प्रतिनिधी 
बीड : आजकाल अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या शोधत आहेत. परंतु अजय चव्हाण यांसारखे काही तरुण असतात जे आपल्या मेहनत आणि धाडसाने व्यवसाय जगात यशाचा मार्ग निर्माण करतात. बीड येथील अजय चव्हाण यांचे जीवन एका  नोकरीपासून सुरू होऊन आज स्वतःच्या नर्सरी व्यवसायापर्यंत पोहोचले आहे.
अजय चव्हाण यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका कंपनीमध्ये नोकरी करून केली. सुरुवातीला ते दरमहा 17 ते 18 हजार रुपये कमावत होते. परंतु काही काळानंतर त्यांना या नोकरीत असमाधान वाटू लागले. मनात एक गोष्ट ठरवली होती की आपल्या जीवनात काहीतरी वेगळं आणि स्वतंत्र करावं. अशा परिस्थितीत अजय यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नोकरी सोडून अजय गावाकडे परतले आणि नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्यांना व्यवसायासाठी किमान भांडवल असण्याची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी काही आर्थिक संसाधनांची व्यवस्था केली आणि छोटीशी नर्सरी सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. बाजारपेठेतील स्पर्धा योग्य पुरवठा यासारख्या अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागला.
advertisement
अजय यांनी खूपच मेहनत केली. त्यांनी नर्सरी व्यवसायातील सर्व पैलू शिकले आणि वेळोवेळी सुधारणा करत गेले. त्यांची नर्सरी छोटीशी असली तरी अजयने त्यात गुणवत्ता आणि सेवा यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्या नर्सरीतील विविध प्रकारच्या झाडांची गुणवत्ता त्यांची देखभाल आणि ग्राहकांना दिलेली सेवा यामुळे त्यांची नर्सरी वेगळी आणि आकर्षक ठरली. सुरुवातीला त्यांनी काही गुंठ्यांमध्ये व्यवसाय सुरू केला होता. पण त्यांच्या कर्तृत्वामुळे व्यवसाय झपाट्याने वाढला.
advertisement
आज अजय चव्हाण यांच्या नर्सरीच्या व्यवसायाचे क्षेत्र 10 ते 15 गुंठ्यांपर्यंत पोहोचले आहे. नर्सरीच्या माध्यमातून आज अजय दरवर्षी कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये नफा कमवतात. हा व्यवसाय त्यांच्यासाठी फक्त आर्थिक फायदे पुरवणाराच नव्हे तर त्यांना आत्मसंतोष आणि कठीण परिस्थितीतून स्वतःला सक्षम बनवण्याची ऊर्जा देतो. अजय चव्हाण यांचा अनुभव इतर युवकांसाठी एक प्रेरणादायी आहे. ते सांगतात, 'आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्यात मेहनत घेतो त्यात यश मिळवणं कठीण नसतं. सुरुवातीला अडचणी येतातच परंतु धाडस आणि आत्मविश्वास ठेवल्यास प्रत्येक अडचण पार केली जाऊ शकते.'
advertisement
आज अजय चव्हाण नर्सरी व्यवसायात यशस्वी असून ते एक आदर्श व्यवसायिक बनलेले आहेत. त्यांच्या यशाची गाथा हे दर्शवते की, जर आपल्याकडे योग्य दिशा आणि मेहनत असेल, तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. अजय चव्हाण यांचा हा संघर्ष आणि यश त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी प्रेरणादायक ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
नोकरी सोडली, 10 गुंठ्यात यशस्वी केला नर्सरी व्यवसाय, तरुणाची 5 लाखांची कमाई
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement