Wheat Framing : मानलं शेतकऱ्याला, शून्य मशागत तंत्राचा केला वापर, मिळवलं एकरी 20 क्विंटल गहू उत्पन्न, Video

Last Updated:

अमरावतीमधील युवा शेतकरी शिवराज मेटकर यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून शेती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक शेती सुद्धा ते करत आहेत. यावर्षी त्यांनी कमीत कमी खर्चात एकरी 20 क्विंटल असे गव्हाचे उत्पन्न घेतले आहे. 

+
Amaravati

Amaravati Farmer 

अमरावती : अमरावतीमधील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नेहमी करत असतात. त्यातून त्यांनी शेती क्षेत्रात आपले मोठे नाव केले आहे. आता त्यांच्या सोबतीला त्यांचा मुलगा शिवराज मेटकर सुद्धा आहे. त्यांनी यावर्षी 15 एकरमध्ये गहू लागवड केली होती. त्यांची गहू लागवड ही पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने होती. त्यात कोणतेही रसायन त्यांनी वापरले नाही. फक्त आणि फक्त पोल्ट्री खत त्याचबरोबर त्यांनी स्वतः तयार केलेलं जीवामृत इतकंच त्यात वापरलं. त्यातून त्यांना एकरी 20 क्विंटल असे उत्पन्न मिळाले आहे. अनेकांना या वर्षी भरपूर खर्च लावून सुद्धा चांगले उत्पन्न मिळाले नाही. त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी आहे.
युवा शेतकरी शिवराज मेटकर यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, आमच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून नैसर्गिक शेतीवर भर दिला जात आहे. त्यातीलच एक प्रयोग म्हणून माझ्या बाबांनी पंचामृत तयार केलं. ते ताक, चुना, गूळ, तुरटी आणि अंडी वापरून बनवले जाते. त्याचा वापर केल्याने जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते आणि पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होत नाही. आम्ही गहू या पिकांत सुद्धा तीच फवारणी केली.
advertisement
शून्य मशागत तंत्राचा वापर
यावर्षी 15 एकरमध्ये नोव्हेंबर महिन्यात आम्ही गहू लागवड केली होती. त्यासाठी अजित आणि लोकन हे दोन आम्ही वापरले. गव्हाची लागवड केल्यानंतर त्यात कोणतेही रसायन वापरलेले नाही. आमच्याकडे पोल्ट्री फार्म असल्याने तेथीलच पोल्ट्री खत आम्ही जमिनीतून गव्हाला दिले. त्यानंतर 4 वेळा पंचामृत स्प्रेइंग केले. सुरुवातीला स्प्रिंकलरने पाणी दिले. या व्यतिरिक्त काहीही वापरले नाही. शून्य मशागत तंत्राचा वापर करून ही गहू लागवड आम्ही केली आहे. यातून चांगले उत्पादन सुद्धा आम्हाला मिळाले आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतल्याने शेतीमध्ये खूप फायदा होताना दिसून येत आहे. पुढेही शेतीमध्ये असेच नवनवीन प्रयोग आम्ही सुरू ठेवणार आहे, असे शिवराज यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Wheat Framing : मानलं शेतकऱ्याला, शून्य मशागत तंत्राचा केला वापर, मिळवलं एकरी 20 क्विंटल गहू उत्पन्न, Video
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement