advertisement

द्राक्षांचा भाव पडला, हताश शेतकऱ्याने लढवली शक्कल, केली लाखोंची कमाई

Last Updated:

द्राक्ष बागायतदार असलेल्या अंकुश इंगोले यांनी पपई शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवलं आहे. चांगला दर नसल्याने द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवावी लागल्यानंतर त्यांनी पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

+
शेतकरी

शेतकरी अंकुश इंगोले 

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : शेती करायची म्हटलं की विविध संकटे अडचणी या आल्याच मात्र अनेक शेतकरी या संकटांवर आणि अडचणीवर मात करतात. त्यापैकीच एक आहेत जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील रहिवासी असलेले अंकुश इंगोले. द्राक्ष बागायतदार असलेल्या अंकुश इंगोले यांनी पपई शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवलं आहे. चांगला दर नसल्याने द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवावी लागल्यानंतर त्यांनी पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. केवळ 30 गुंठे पपई लागवडीतून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न झालंय. पाहुयात कसं केलं इंगोले यांनी पपई शेतीचे नियोजन.
advertisement
जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील धारकल्याण या गावचे इंगोले हे रहिवासी आहेत. कोविड लॉकडाऊनपासून द्राक्ष शेती घाट्यात येऊ लागली. त्यामुळे द्राक्ष शेतीवर त्यांना कुऱ्हाड चालवावी लागली. मात्र द्राक्षासाठी शेतीसाठी तयार केलेल्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी पपई हे पर्यायी पीक शोधले. 15 नंबर व्हरायटीची पपईची जात त्यांनी यासाठी निवडली. शेतामध्ये नऊ बाय पाच अशा अंतरावर या पपईची लागवड केली. बरोबर द्राक्ष बागेच्या स्ट्रक्चरमधून पपईला बाहेर काढले.
advertisement
योग्य खत आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्याने पपईची बाग आता बहरत आहे. आतापर्यंत त्यांनी 15 टन पपईची विक्री केली असून या पपईला 12 ते 15 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. तर आणखी चार ते पाच पपईचे उत्पन्न त्यांना अपेक्षित असून एकूण दीड ते 2 लाख रुपये उत्पन्न त्यांना पपई शेतीमधून होणार आहे.
advertisement
द्राक्षांना भाव नसल्याने पपई शेतीकडे वळलो. अनेक अडचणी आल्या. मध्यंतरी पाणी कमी असल्याने पपई काढून टाकावी असा विचारही मनात आला. परंतु इकडून तिकडून ॲडजस्ट करून पाण्याची सोय केली. आता पपईचे पीक जोमात आहे. त्यामुळे आणखी चार ते पाच टन उत्पन्न देखील अशी अपेक्षा आहे. द्राक्षांना मिळत असलेल्या कमी दर यामुळे पर्यायी पिके घ्यावी लागत असल्याचे अंकुश इंगोले यांनी सांगितलं. पपईच्या शेतीमधून दीड लाखांचे उत्पन्न झालं असून आणखी 50 हजारांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
द्राक्षांचा भाव पडला, हताश शेतकऱ्याने लढवली शक्कल, केली लाखोंची कमाई
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement