कंपनीचा CEO काहीच नाही! शेतकऱ्याने शेतीतून कमावले 8 कोटी रुपये, प्रत्येकांनी पाहावी अशी रिअल स्टोरी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
शशिकांत काळगी हे सिमला मिरचीची 40 एकरामध्ये टप्प्याटप्प्याने लागवड करतात. तसेच 40 एकरामध्ये टोमॅटोची लागवड करतात.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: कायमस्वरूपी दुष्काळी क्षेत्र असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत वर्षाला 8 कोटींचे उत्पन्न घेत आहेत. जत शहरालगत असणाऱ्या रामपूर गावच्या हद्दीत शशिकांत शिवाजीराव काळगी यांची 300 एकर शेत जमीन आहे. यापैकी 80 एकराहून जास्त बागायत शेतजमीन असून त्यामध्ये ते टोमॅटो, शिमला मिरची, हळद, आले या पिकांचे प्रचंड उत्पादन घेतात. त्यांना 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पंजाबराव देशमुख कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
advertisement
शशिकांत काळगी हे सिमला मिरचीची 40 एकरामध्ये टप्प्याटप्प्याने लागवड करतात. तसेच 40 एकरामध्ये टोमॅटोची लागवड करतात. आधुनिक पद्धतीने शेणखते, मल्चिंग पेपर, आणि ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. विश्वासू रोपवाटिकेतून तयार रोपे आणून लागवड करतात. रोपांच्या लागवडीनंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे आणि फवारण्यांचे व्यवस्थापन करतात. साठ दिवसानंतर मिरचीचे तोडे सुरु होऊन बाजारपेठेत मिरची पाठवली जाते. योग्य व्यवस्थापनाने पाच ते सात महिन्यांत सिमला मिरचीचे सुमारे 15 तोडे होतात. एकरी 45 त्यांना प्रमाणे ते 40 एकरत 1500 टनांहून अधिक मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
advertisement
उत्तम दर्जाची सिमला मिरची
advertisement
काटेकोर व्यवस्थापनामुळे काळगी यांच्या मळ्यामध्ये उत्तम दर्जाची शिमला मिरची उत्पादित होते. सिमला मिरचीचा चांगल्या प्रतीचा माल निवडून पॅकिंग बॉक्समध्ये भरला जातो. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आधी राजांच्या बाजारपेठांमध्ये पाठवतात. टप्प्याटप्प्याने लागवड केल्याने टोमॅटो आणि सिमला मिरचीची दोन पिके त्यांच्याकडे बारा महिन्यांसाठी उपलब्ध असतात. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांची मागणी काळगी पूर्ण करत आहेत. यंदा बारा महिने सिमला मिरचीची बाजारपेठ चांगली चालल्याने भरघोस नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
पुढची पिढी देखील आधुनिक शेतीत
शशिकांत काळगी यांचे वडील शिवाजीराव काळगी हे पारंपारिक परंतु उत्तम शेती करत होते. 1994 पासून शशिकांत काळगी यांनी शेतीमध्ये लक्ष घातले. कायद्याचे शिक्षण घेऊन देखील त्यांनी वडिलांच्या सल्ल्याने शेतीचा अभ्यास केला. हवामान, पाण्याची उपलब्धता, मातीचे आरोग्य आणि बाजारपेठेच्या मागणीचा अभ्यास करत काळगी यांची तिसरी पिढी आधुनिक शेतीत उतरली आहे. मोठा मुलगा मुरगेश यांनी एग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आहे. तर धाकटा मुलगा योगेश यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन देखील आधुनिक शेतीत लक्ष घातले आहे.
advertisement
काळगी यांचे शेतीचे अर्थशास्त्र असे
शशिकांत काळगी गेल्या 30 वर्षापासून अभ्यासपूर्ण शेती करत आहेत काळगे यांच्या मते प्रत्येक शेतकऱ्याने भाजीपाला शेतीत उतरताना शेतकऱ्याने कोणतीही दोन पिके निवडली पाहिजेत. निवडलेली दोन पिके वर्षभरासाठी शेतकऱ्याकडे उपलब्ध असायलाच हवीत. यामुळे बाजारभावात चढ-उतार झाले तरी संपूर्ण खर्च करत वजा जाता किलोमागे पाच रुपयांचा नफा अपेक्षित ठेवतात.
advertisement
70 हून अधिक लोकांना देतात रोजगार
काळगी परिवारास 80 एकराहून अधिक बागायत पिकवताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. काळजी यांनी शेतासाठी दोन व्यवस्थापक नेमले आहेत. शेती सल्लागारांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थापन होते. दोन्ही व्यवस्थापक सत्तरहून अधिक स्त्री पुरुष कामगारांच्या सहाय्याने शेतातील कामे पूर्ण करतात. मनुष्यबळाने सर्व व्यवस्थापन वेळच्यावेळी पूर्ण होत असल्याने उत्पादनात भरघोस वाढ होत आहे. शिवाय सत्तरहून अधिक लोकांना बारा महिन्यांसाठी वर्षानुवर्ष रोजगार मिळत आहे.
दुष्काळास मानतात देणगी
शशिकांत काळगी यांचा शेतीचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या मते दुष्काळी परिस्थिती आणि कोरड्या हवामानामुळे जत परिसरात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण राहते. कमी पर्जन्यमान असले तरी ऊन आणि थंडीचा प्रादुर्भाव देखील कमीच राहतो. यामुळे बारा महिने स्वच्छ हवा राहते. स्वच्छ हवामानामुळे रोगराईचे प्रमाण कमी राहून भाजीपाल्याचे उत्तम पोषण होते.
शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय निवडावा
काळगी यांच्या मते दुष्काळी भागातील शेती अधिक संघर्षातून पिकवली जाते. खडकाळ जमिनी आणि पाण्याची कमतरता असल्याने या शेतीस ते "फायटिंग फार्मिंग" म्हणतात. परंतु अधिक आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय शेतकऱ्यांनी निवडल्यास त्याच कष्टामध्ये शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कष्ट आणि काटेकोर नियोजन करण्याची तयारी असल्याने त्यांनी भाजीपाला पिकाकडे वळण्याचे आवाहन शशिकांत काळगी शेतकरी वर्गाला करतात.
जत सारख्या दुष्काळी भागात त्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे त्यांना वर्षाला 8 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आधुनिक शेती पध्दतीसह बाजारपेठेचा अचूक अभ्यास केला आहे. यामुळेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांसाठी शशिकांत काळगी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
January 09, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कंपनीचा CEO काहीच नाही! शेतकऱ्याने शेतीतून कमावले 8 कोटी रुपये, प्रत्येकांनी पाहावी अशी रिअल स्टोरी