पारंपरिक शेतीतून मिळत नव्हतं उत्पन्न, तरुण शेतकऱ्यानं सुरु केला गूळ उद्योग, आता वर्षाला 8 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
खरंतर गुळ उद्योगाच्या माध्यमातून आजवर अनेक व्यावसायिकांनी चांगली प्रगती केलेली आहे. अशाच एका गूळ व्यावसायिकाची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : पावसाळा संपला की गूळ निर्मिती उद्योग चालू होऊ लागतात. खरंतर गूळ उद्योगाच्या माध्यमातून आजवर अनेक व्यावसायिकांनी चांगली प्रगती केलेली आहे. अशाच एका गूळ व्यावसायिकाची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत. जे अगदी गावरान पद्धतीने गुळाची निर्मिती करतात. बीडमधील या तरुणाचे नाव अण्णासाहेब मोरे असून तो गूळ निर्मिती व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
अण्णासाहेब मोरे हा तरुण बीड जिल्ह्यातील कार्य गावचा आहे. या व्यवसायामध्ये येण्याआधी तो पारंपरिक शेती करत होता. यामध्ये ज्वारी, ऊस, कापूस किंवा सोयाबीन या पिकांची तो लागवड करत असे. परंतु पारंपरिक पिकाच्या माध्यमातून त्यांना फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं. आणि मग त्यांनी काहीतरी व्यवसाय करावा म्हणून गूळ निर्मितीबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली.
advertisement
सुरुवातीला या व्यवसायामध्ये भरपूर अडचणी आल्या. परंतु त्या अडचणींवर मात करत या तरुणाने कामांमध्ये सातत्य टिकून ठेवलं आणि व्यवसायाला चांगली दिशा मिळू लागली. व्यवसायाची सुरुवात अगदी छोटीशी होती. परंतु हळूहळू व्यवसायाला चांगली दिशा मिळू लागली आणि व्यवसायामध्ये भांडवल वाढवावं लागलं.
advertisement
गुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला इथं मिळतात. यामध्ये देशी तुपाचा गूळ, कवळ्याच्या मुळीचा गूळ, मधाचा गूळ, चॉकलेट गूळ आणि त्याचबरोबर साधा गूळ अशा गुळाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला इथे चाखायला मिळतात. खरंतर त्यांना काही वेळा मजुरांची चणचण भासते. अशावेळी गुळ निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत त्यांना स्वतःलाच सगळं काही करावं लागतं.
गूळ निर्मिती करत असताना उसाचा द्रव हा अगदी घट होईपर्यंत त्याला तापवलं जातं. आणि तो पदार्थ घट झाल्यानंतर त्याला एका साच्यामध्ये काढलं जातं. साच्यामध्ये काढल्यानंतर गुळाला वेगवेगळ्या साईजमध्ये विभागलं जातं. जास्तीत जास्त क्षेत्रात शेती करून देखील त्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळत नाही परंतु त्या तुलनेने फक्त आठ गुंठे एवढ्या क्षेत्रामध्ये गूळ निर्मिती हा व्यवसाय करत मला चांगलं उत्पन्न मिळत आहे. गूळ निर्मिती या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 7 ते 8 लाखांपर्यंतचा नफा मिळवतो, असं अण्णासाहेब मोरे या तरुणीने सांगितलं.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
November 18, 2024 12:17 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक शेतीतून मिळत नव्हतं उत्पन्न, तरुण शेतकऱ्यानं सुरु केला गूळ उद्योग, आता वर्षाला 8 लाखांची कमाई