ऊसतोड मजुराने सुरु केला पोल्ट्री फार्म व्यवसाय, 45 दिवसाला 70 हजारांची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीडमधील सय्यद सहमद यांची अशीच कहाणी असून ते पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करत आहेत.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड : दिवसेंदिवस पोल्ट्री फार्म या व्यवसायाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाढत आहे. खर तर हा व्यवसाय अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये तुम्ही सुरू करू शकता. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीडमधील सय्यद सहमद यांची अशीच कहाणी असून ते पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करत आहेत.
advertisement
बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचे सय्यद सहमद हे आधी ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतं. त्या माध्यमातून त्यांना आर्थिक दृष्ट्या काही लाभ होत नसल्याने ते निराशा जनक परिस्थितीत अडकलेले होते. स्वतःचा काहीतरी व्यवसाय करता यावा म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र अपयश आलं. काही दिवसानंतर पोल्ट्री फार्म या व्यवसायाबद्दल त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी 500 पक्षी असणाऱ्या कोंबड्यांचा एक शेड तयार केला.
advertisement
खरंतर हा शेड वैयक्तिक किरकोळ विक्रीसाठी ते चालवू लागले. परंतु या माध्यमातून त्यांना फारसं काही मिळालं नाही. म्हणून त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र इथून पुढे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार होतं. पोल्ट्री फार्म शेड उभारण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये सुरुवातीला खर्च आला. यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु इथूनच त्यांच्या व्यवसायाला एक वेगळी दिशा मिळाली.
advertisement
त्यांच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर या व्यवसायाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत असून ठोक विक्रीच्या माध्यमातून ते 60 ते 70 हजार रुपये प्रत्येक 45 दिवसाला मिळवतात. शेडमध्ये 4000 एवढी पक्षांची संख्या आहे. खरतर हा व्यवसाय करण्यामागचा त्यांचा एकच उद्देश आहे की त्यांना जमिनीचा क्षेत्र कमी प्रमाणात आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 14, 2024 5:02 PM IST