फक्त साडेपाच लाख रु भांडवल गुंतवलं! तरुण आता हिरव्या सोन्यातून करतोय २०० कोटींची कमाई

Last Updated:

Success Story :  जिद्द, कष्ट आणि नवकल्पनांची साथ लाभली, तर मर्यादित साधनांतूनही असामान्य यश मिळवता येते. हे पुन्हा एकदा एका तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे.

success story
success story
मुंबई : जिद्द, कष्ट आणि नवकल्पनांची साथ लाभली, तर मर्यादित साधनांतूनही असामान्य यश मिळवता येते. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे तामिळनाडूतील तिरुपूरच्या बी. विजयराघवन यांनी. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने केवळ ५.५ लाखांच्या भांडवलावर व्यवसाय सुरू करून आज तब्बल २०० कोटी रुपयांचे वस्त्रोद्योग साम्राज्य उभे केले आहे. केवळ आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी उत्पादनच नव्हे, तर बांबूच्या तंतूपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक इनरवेअरचा वेगळा ब्रँड उभारून त्यांनी भारतीय कापड उद्योगाला नवी दिशा दिली आहे.
२१ व्या वर्षी घेतला धाडसी निर्णय
विजयराघवन यांचा प्रवास अत्यंत साध्या सुरुवातीपासून सुरू झाला. १९९५ साली, अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी उद्योजकतेचा धाडसी निर्णय घेतला. कापड अभियांत्रिकीचा डिप्लोमा घेतल्यानंतर, जुन्या मशिन्स आणि मर्यादित भांडवलाच्या जोरावर त्यांनी तिरुपूरमध्ये एक छोटे विणकाम युनिट सुरू केले. राजपालयम या छोट्या शहरात शिक्षिका आई आणि बँक व्यवस्थापक वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या विजयराघवन यांना लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या कंपनीला पालकांच्या नावावरून ‘बीएस अ‍ॅपेरल’ असे नाव दिले, जे पुढे ‘बीव्हीके एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
३,००० नगांवरून थेट ४ लाख नगांपर्यंत पोहोचली
सुरुवातीच्या काळात केवळ कापसाच्या धाग्यांपासून कापड तयार करून ते इतर उत्पादकांना पुरवले जात होते. मात्र, बाजाराची गरज ओळखून त्यांनी टी-शर्ट आणि ट्रॅक पँट्सचे उत्पादन सुरू केले. आकर्षक डिझाइन्स, दर्जेदार कापड आणि वेळेवर पुरवठा या त्रिसूत्रीमुळे त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. निर्यात बाजारातही त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आणि मासिक उत्पादन क्षमता ३,००० नगांवरून थेट ४ लाख नगांपर्यंत पोहोचली.
advertisement
व्हॅन ह्यूसेन, प्यूमा, रेमंड आणि बॉस कंपन्यांसाठी काम
आज विजयराघवन यांची कंपनी व्हॅन ह्यूसेन, प्यूमा, रेमंड आणि बॉस यांसारख्या नामांकित जागतिक ब्रँडसाठी कपडे तयार करते. त्यांच्या अत्याधुनिक कारखान्यात ४५ विणकाम यंत्रे, ८५० शिलाई मशिन्स असून सुमारे १,६०० कर्मचारी कार्यरत आहेत. गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेवर असलेला त्यांचा भरच त्यांच्या यशाचे मुख्य गमक मानले जाते. कापसासोबतच बांबू-कापूस, मेरिनो लोकर आणि टेन्सेल यांसारख्या आधुनिक मिश्रणांचे कापड तयार करून त्यांनी उत्पादनात वैविध्य आणले आहे.
advertisement
बांबूच्या तंतूपासून बनवली इनरवेअर
२०१० साली त्यांनी पत्नी लावण्य यांच्या नावावर ‘लावोस’ हा इनरवेअर ब्रँड सुरू केला. बांबूच्या तंतूपासून बनवलेली ही उत्पादने मऊ, घाम शोषणारी, तापमान नियंत्रित करणारी आणि दुर्गंधी प्रतिरोधक आहेत. ईशान्य भारतातून मिळणाऱ्या बांबू फायबरचा वापर करून तयार केलेली ही इनरवेअर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. दररोज १,५०० हून अधिक तुकड्यांची विक्री होत असल्याचे सांगितले जाते.
advertisement
उद्योगातील यशासोबतच विजयराघवन यांनी पर्यावरण आणि समाजाप्रतीही आपली बांधिलकी जपली आहे. त्यांचा कारखाना पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेवर चालतो, तसेच अतिरिक्त वीज राज्य वीज मंडळाला विकली जाते. सांडपाण्यापैकी ९५ टक्के पाणी पुनर्वापरात आणले जाते. भविष्यात राजपालयममध्ये केवळ महिलांसाठी रोजगार देणारे युनिट सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अडचणी, आर्थिक चढ-उतार आणि स्पर्धा असूनही हार न मानता त्यांनी दाखवलेला हा प्रवास आज अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
फक्त साडेपाच लाख रु भांडवल गुंतवलं! तरुण आता हिरव्या सोन्यातून करतोय २०० कोटींची कमाई
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement