advertisement

दिवाळीआधी रेशनबाबत मोठा निर्णय! १९ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी मिळणार, यादी आली समोर

Last Updated:

Ration Vatap : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना या वर्षीच्या दिवाळीत “आनंदाचा शिधा” मिळणार नाही. पुरवठा विभागाने यंदा राज्यातील १९ जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Ration Card
Ration Card
हिंगोली : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना या वर्षीच्या दिवाळीत “आनंदाचा शिधा” मिळणार नाही. पुरवठा विभागाने यंदा राज्यातील १९ जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांना “भाकरी खाऊन दिवाळी साजरी करावी लागणार” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शासनाचा हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
यंदा 'आनंदाचा शिधा' नाही
राज्यातील अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत दरमहा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो. मागील तीन वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात शासनाकडून “आनंदाचा शिधा” म्हणून अतिरिक्त वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आला आहे.
advertisement
त्याचबरोबर, पुरवठा विभागाने यंदा १९ जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना आता २० किलो तांदूळ, साडेसात किलो गहू आणि साडेसात किलो ज्वारी मिळणार आहे. प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना एक युनिटसाठी एक किलो गहू, एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत याचे वितरण सुरू आहे.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना ज्वारी मिळणार?
हिंगोली, बुलढाणा, अकोला, जळगाव, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर), लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.
स्थानिक पातळीवर काही जिल्ह्यांतून ज्वारीचा पुरवठा सुरू झाला आहे. अकोला, बुलढाणा आणि जळगाव येथे खरेदी झालेली ज्वारी अनुक्रमे हिंगोली, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नंदुरबार या जिल्ह्यांनी उचलली आहे. उर्वरित जिल्ह्यांनी स्थानिक खरेदी केंद्रांमधून पुरवठा घेतला आहे.
advertisement
डिसेंबरपर्यंत वाटप सुरू राहणार
जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले की, २०२४-२५ या विपणन हंगामात राज्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी झाल्याने ती साठवणुकीत राहिली होती. त्यामुळे या अतिरिक्त साठ्याचा उपयोग सार्वजनिक वितरण व्यवस्थेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हे वाटप होणार असून काही जिल्ह्यांत डिसेंबरपर्यंत ते सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
दिवाळीआधी रेशनबाबत मोठा निर्णय! १९ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी मिळणार, यादी आली समोर
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement